राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे २२ ऑगस्ट या दिवशी दुपारी गोवा दौर्‍यासाठी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.

कल्‍याण येथे शिक्षकाकडून ५ वर्षीय विद्यार्थ्‍यावर लैंगिक अत्‍याचाराचा प्रयत्न !

असे वासनांध शिक्षक म्‍हणजे शिक्षण विभागाला लागलेला कलंकच !
अशांना बडतर्फच करायला हवे !

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांना ठार मारण्‍याची धमकी !

१६ ऑगस्‍टपासून विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती नवनीत राणा यांच्‍या भ्रमणभाषवर संपर्क साधून ‘गर्दीच्‍या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करीन, ते कळणारही नाही’, अशा शब्‍दांमध्‍ये धमकी देत असून त्‍याने अश्‍लील शिवीगाळही केली आहे’

राज्‍यात ‘कांदा महाबँक’ ही संकल्‍पना राबवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

प्रत्‍यक्ष अणि अप्रत्‍यक्षरित्‍या ६० सहस्रांहून अधिक रोजगार निर्माण होईल. यामुळे कांद्याचा प्रश्‍न कायमस्‍वरूपी मार्गी लागेल. कांद्याच्‍या बाजारभावाची घसरण रोखण्‍यासाठी विविध शिफारशींवरही विचार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे लाभार्थी नसतांना ४० सहस्र घरांची निविदा !

पंतप्रधानांच्‍या नावाने योजना चालू असूनही महापालिका अधिकार्‍यांमध्‍ये प्रचंड अनास्‍था आहे. ऑक्‍टोबरनंतर १० मासांनी दिशा समितीची बैठक झाली. ती ३ मासांत होणे अपेक्षित होते.

वैदिक विज्ञान आणि मंत्रशास्‍त्राचे अभ्‍यासक डॉ. फडके यांचा मंत्रशास्‍त्रातील संशोधनाविषयी सन्‍मान !

या वेळी डॉ. फडके म्‍हणाले की, ज्‍योतिष हे शास्‍त्र असून त्‍यातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. अथर्व वेदातील कर्मजभाव व्‍याधी दैवी चिकित्‍सा आणि ज्‍योतिष शास्‍त्राचा अभ्‍यास करून त्‍यायोगे मोठे व्‍याधी निवारण करता येते.

पुण्‍येश्‍वर मंदिर परिसरातील मशिदीच्‍या अतिक्रमणाच्‍या विरोधात हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे आंदोलन !

यासाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्‍वत: हून कारवाई का करत नाही ?

मराठवाड्यातील ४ जिल्‍हे मुलींच्‍या बालगृहाविना ! – अधिवक्‍त्‍या सुशीबेन शाह, अध्‍यक्षा, बाल हक्‍क संरक्षण आयोग

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतर महाराष्‍ट्रातील काही जिल्‍ह्यांमध्‍ये मुलींसाठी बालगृह नसणे, हे संतापजनक आहे. यावर लवकरात लवकर उपाय काढणे आवश्‍यक !

पुणे येथील आतंकवाद्यांचे धागेदोरे पुष्‍कळ लांबपर्यंत ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

अशा सूचना पोलिसांना का कराव्‍या लागतात ? हे सर्व पोलिसांना दिसत नाही का ? कि पोलीस याकडे दुर्लक्ष करतात !

हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणाऱ्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा हिंदुद्रोह !

‘काही पंथीय पैसे देऊन किंवा धमकावून इतरांना आपल्या पंथात खेचतात. याउलट हिंदु धर्मात येतात ते त्यातील अद्वितीय शिकवणीमुळे ! असे असले, तरी बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले