पुण्‍येश्‍वर मंदिर परिसरातील मशिदीच्‍या अतिक्रमणाच्‍या विरोधात हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे आंदोलन !

ठिय्या आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते (छायाचित्र सौजन्य : TV9 मराठी)

पुणे – येथील पुण्‍येश्‍वर मंदिराच्‍या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटवण्‍यात यावे, यासाठी पुणे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांच्‍या दालनाबाहेर विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी तासभर ठिय्‍या आंदोलन केले. (यासाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्‍वत: हून कारवाई का करत नाही ?- संपादक)

या वेळी बोलतांना भाजपचे शहर अध्‍यक्ष धीरज घाटे म्‍हणाले की, मशिदीचे अतिक्रमण हटवण्‍यासाठी आजपर्यंत प्रशासनाच्‍या समवेत अनेक वेळा पत्रव्‍यवहार केला; मात्र कोणत्‍याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे आज आम्‍ही हे ठिय्‍या आंदोलन करत आहोत. या आंदोलनाची प्रशासनाने नोंद घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी, अन्‍यथा भविष्‍यात अधिक तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणीसुद्धा त्‍यांनी दिली. या वेळी ‘समस्‍त हिंदु आघाडी’चे मिलिंद एकबोटे, ‘पतित पावन संघटने’चे अध्‍यक्ष स्‍वप्‍नील नाईक यांच्‍यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.