राज्‍य परीक्षा परिषदेच्‍या आयुक्‍त शैलजा दराडे यांना अटक !

शिक्षण विभागात नोकरी लावण्‍याचे आमीष दाखवून ४४ जणांची अंदाजे ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषदेच्‍या तत्‍कालीन आणि सध्‍या निलंबित आयुक्‍त शैलजा दराडे यांना अटक केली असून पुणे लष्‍कर न्‍यायालयाने त्‍यांना १२ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांची अपकीर्ती न थांबल्‍यास राज्‍यव्‍यापी आंदोलन करू ! – सकल हिंदु समाज, कोल्‍हापूर

अमरावती येथील सभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका धारकर्‍याला ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्‍तकातील उतारा वाचण्‍यास सांगितला होता. काँग्रेस सरकारच्‍या काळात प्रकाशित झालेले हे पुस्‍तक आहे. असे असतांना विधानसभेत आणि राज्‍यभर काँग्रेस, पुरोगामी, डावे अकारण पू. भिडेगुरुजी यांच्‍यावर खोटे आरोप करून त्‍यांची अपकीर्ती करत आहेत, आंदोलन करत आहेत.

गरुड मंडप, नगारखाना आणि मनकर्णिका कुंड यांचा आराखडा पुरातत्‍व विभागाला सादर ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी

साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडप, नगारखाना आणि मनकर्णिका कुंड यांचा आराखडा पुरातत्‍व विभागाला सादर करण्‍यात आला आहे. पुरातत्‍व विभागाकडून नियुक्‍त केलेल्‍या सल्लागाराकडून तो सिद्ध करण्‍यात आला आहे.

पुणे-मुंबई उद्यान एक्‍सप्रेसमध्‍ये महिलेचा विनयभंग करून तिला खाली ढकलणारा अटकेत !

मध्‍य रेल्‍वेवरील पुणे-मुंबई उद्यान एक्‍सप्रेसमध्‍ये महिलेचा विनयभंग करून तिच्‍याकडील रोख रक्‍कम बळजोरीने खेचून तिला एक्‍सप्रेसमधून ढकलणारा आरोपी मनोज चौधरी (वय ३२ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दादर रेल्‍वे पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. 

उंबरे (राहुरी) येथील प्रकरण सरळसरळ मानवी तस्‍करी आणि ‘ब्‍लॅकमेलिंग’ यांचा प्रकार ! – प्रियांक कान्‍गो, राष्‍ट्रीय बालहक्‍क संरक्षण आयोगाचे अध्‍यक्ष

उंबरे येथील अल्‍पवयीन मुलींच्‍या धर्मांतर प्रकरणी अन्‍वेषण करणार्‍या पोलिसांची यंत्रणा कुचकामी आहे. उंबरे येथील प्रकरण सरळसरळ मानवी तस्‍करी आणि ‘ब्‍लॅकमेलिंग’ यांचा प्रकार आहे. पोलिसांनी प्रथम दर्शनी अहवालामध्‍ये योग्‍य कलमे लावली नाहीत. कायदा आणि सुव्‍यवस्‍थेच्‍या दृष्‍टीने अन्‍वेषण पुष्‍कळच कमकुवत आहे. आरोपींना शिक्षा करण्‍याऐवजी ‘क्रॉस कंप्‍लेंट’ करण्‍याकडे पोलिसांचा आग्रह होता.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित असलेले हिंदु राष्‍ट्र पूर्ण होण्‍यासाठी प्रयत्न करूया ! – शरद पोंक्षे

गांधींच्‍या अहिंसा तत्त्वामुळे हिंदूंमधील क्षात्रवृत्ती लोप पावली, ही हिंदु समाजाची फार मोठी हानी झाली. याउलट स्‍वातंत्र्यवीर सावरकर हे स्‍वातंत्र्याचे यज्ञकुंड होते. त्‍या काळातील प्रत्‍येक क्रांतीकारकांसाठी ते आदर्श होते. स्‍वातंत्र्यानंतर सावरकरांना सातत्‍याने अपमानीत करण्‍यात आले.

विज्ञानाची मर्यादा !

‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गणेशोत्‍सवाआधी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका चालू करणार ! – मुख्‍यमंत्री

मुंबई-सिंधुदुर्ग मार्गाच्‍या सविस्‍तर प्रकल्‍प अहवालाचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्‍विटरद्वारे दिली.

कोंढवा (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत १५० किलो गोमांस जप्‍त !

कोंढवा येथून कात्रजकडे ६ ऑगस्‍ट या दिवशी गोमांसाची अवैध वाहतूक होणार असल्‍याची माहिती गोरक्षक राहुल कदम यांना मिळाली होती.