राज्‍य परीक्षा परिषदेच्‍या आयुक्‍त शैलजा दराडे यांना अटक !

पुणे – शिक्षण विभागात नोकरी लावण्‍याचे आमीष दाखवून ४४ जणांची अंदाजे ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषदेच्‍या तत्‍कालीन आणि सध्‍या निलंबित आयुक्‍त शैलजा दराडे यांना अटक केली असून पुणे लष्‍कर न्‍यायालयाने त्‍यांना १२ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फेब्रुवारीमध्‍ये शैलजा दराडे यांच्‍यासह त्‍यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांच्‍या विरोधात हडपसर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद केला होता. तक्रारदार सूर्यवंशी यांनी दिलेल्‍या तक्रारी अन्‍वये शैलजा दराडे यांना अटक केली आहे. शिक्षकांना कायमस्‍वरूपी नोकरी लावण्‍यासाठी शैलजा दराडे भावाच्‍या मदतीने डी.एड्. झालेल्‍या उमेदवारांकडून सुमारे १२ लाख, तर बी.एड्. झालेल्‍या उमेदवारांकडून १४ लाख रुपये घेत होत्‍या.

संपादकीय भूमिका

शिक्षणक्षेत्रामध्‍ये भ्रष्‍टाचार करणारेच अधिकारी असतील, तर तेथील शिक्षणाचा दर्जा कसा असेल ? याचा विचारच न केलेला बरा ! अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !