आहार-विहार सांभाळा !

सांसारिक कृती वेळेत होण्‍यासाठी सर्वसामान्‍य झटतात; पण देवाने जे अमूल्‍य असे शरीर दिले आहे, त्‍याकडे लक्ष देण्‍याची वेळ आली की, कारणे दिली जातात.

वाशिम येथे शालेय पोषण आहारातील डाळ आणि चटणी निकृष्‍ट दर्जाची !

जिल्‍हा परिषद सदस्‍य पांडुरंग ठाकरे यांनी स्‍थायी समितीच्‍या सभेत उपस्‍थित करून ‘लहान मुलांच्‍या आरोग्‍याशी खेळणार्‍या कंत्राटदारावर पोलीस कारवाई करावी’, अशी मागणी केली. त्‍यांनी ही निकृष्‍ट डाळ आणि खिचडी सभागृहातच आणली.

कोल्‍हापूर येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्‍साहात !

सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना बिंदूदाबनाचे महत्त्व सांगून रुग्‍णाला कसे बरे करू शकतो हे शिकवले.

देशाला विश्‍वगुरु करण्‍याच्‍या पंतप्रधानांच्‍या प्रयत्नांना हातभार लावूया ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्‍हापूरच्‍या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. कोल्‍हापूर-मुंबई बंद झालेली सह्याद्री रेल्‍वे चालू करण्‍यासाठी देहलीत २ बैठका झाल्‍या.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात पनवेल येथे गुन्‍हा नोंद

यांनी गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्‍मा जोतिबा फुले आणि पेरीयार नाईकर यांच्‍याविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याचा आरोप करून अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

कल्‍याण येथे ४ वर्षांच्‍या मुलाचे अपहरण करणार्‍या आरोपीला अटक !

आरोपी मुलाला घेऊन नाशिक येथे पळून जाण्‍याच्‍या सिद्धतेत होता; मात्र त्‍यापूर्वीच नाशिक पोलिसांनी तत्‍परतेने कारवाई करत आरोपीला पकडले.

बारामती (पुणे) येथे वर्दळीच्‍या ठिकाणी भरदिवसा पिस्‍तुलाचा धाक दाखवून लुटण्‍याचा प्रकार !

येथील वर्दळीच्‍या ठिकाणी असणार्‍या कृष्‍ण पेट्रोल पंपाचे व्‍यवस्‍थापक मयूर शिंदे यांना भर दिवसा पिस्‍तुलाचा धाक दाखवत लुटण्‍याचा प्रकार घडला.

कल्‍याण येथे शौचालयांची दुर्दशा; नागरिकांच्‍या आरोग्‍यावर परिणाम !

‘स्‍वच्‍छ भारत’चे स्‍वप्‍न पहाणार्‍या देशातील एका राज्‍यातील एका शहरात शौचालयांची अशी दुःस्‍थिती होते, याचा सरकारने विचार करावा !

सातारा जिल्‍ह्यात १९ ऑगस्‍टपर्यंत शस्‍त्र आणि जमाव बंदी आदेश !

सातारा जिल्‍ह्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १९ ऑगस्‍टपर्यंत सातारा जिल्‍ह्यात शस्‍त्र आणि जमाव बंदी आदेश दिले आहेत.

सरकारी व्‍यवस्‍था अपयशी ठरल्‍याचे द्योतक ?

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या वाढत्‍या प्रकरणांवर आळा घालण्‍यासाठी मध्‍यप्रदेशातील अशोकनगर जिल्‍ह्यातील ४ गावांत मुसलमान अन् ख्रिस्‍ती व्‍यापार्‍यांवर प्रवेशबंदी लादण्‍यात आली आहे. ग्रामपंचायतीने हा निर्णय सर्वानुमते घेतला.