पावसाळ्‍यातील सांधेदुखीवर सोपा उपचार

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१७

वैद्य मेघराज पराडकर

सततच्‍या पावसामुळे वातावरणात थंडी वाढू लागल्‍यावर अनेकांना हातापायांचे सांधे दुखण्‍याचा त्रास चालू होतो. असे सांधे दुखत असल्‍यास हिटिंग पॅडच्‍या साहाय्‍याने हातपाय शेकावेत. याने दुखण्‍यापासून लगेच आराम मिळतो. शेकण्‍यासाठी गरम पाणी, शेकोटी किंवा केस वाळवण्‍याचे यंत्र (हेअर ड्रायर) यांचाही वापर करता येतो. कोणत्‍याही पद्धतीने दुखणारा भाग शेकणे महत्त्वाचे आहे.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan