कारवाई टाळण्‍यासाठी लाच मागणार्‍या मंडलाधिकार्‍यावर गुन्‍हा नोंद !

सातारा, २८ जुलै (वार्ता.) – गौण खनिज कायद्याच्‍या अंतर्गत कारवाई टाळण्‍यासाठी कोरेगाव तालुक्‍यातील पिंपोडे बुद्रुक येथील महसूल मंडलाधिकारी संजय बोबडे यांनी ५० सहस्र रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ४० सहस्र रुपये लाच घेण्‍यास सिद्ध असलेल्‍या बोबडे यांच्‍याविरुद्ध वाठार पोलीस ठाण्‍यात लाच मागितल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला. बोबडे हे ३० जून २०२३ या दिवशी शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. सेवेत असतांना मोरबेंद येथे स्‍वखर्चाने गाळ, मुरुम आणि माती काढून त्‍याची वाहतूक करणारे जेसीबी आणि ट्रॅक्‍टर यावर कारवाई न करण्‍यासाठी लाच मागितली होती.