गेल्‍या ५ वर्षांत देशात २ लाख ७५ सहस्र मुले बेपत्ता !

बेपत्ता होणार्‍यांमध्‍ये मुलींची संख्‍या मुलांपेक्षा अधिक !

नवी देहली – केंद्र सरकारच्‍या अहवालानुसार भारतात गेल्‍या ५ वर्षांत २ लाख ७५ सहस्र १२५ मुले बेपत्ता झाली आहेत. यांपैकी २ लाख ४० सहस्र मुलांचा शोध घेण्‍यात आला आहे. बेपत्ता मुलांमध्‍ये मुलींची संख्‍या अधिक आहे. केंद्र सरकारने संसदेत याच्‍याशी संबंधित प्रश्‍नाचे उत्तर देतांना सांगितले की, ज्‍या मुलांचा शोध घेता आला नाही, यांमध्‍ये मध्‍यप्रदेश आणि बंगाल राज्‍यांतील मुले सर्वाधिक आहेत. चाइल्‍ड हेल्‍पलाइन बेपत्ता मुलांचा शोध घेण्‍यासाठी काम करते.

संपादकीय भूमिका : 

अशा प्रकारे मुले बेपत्ता होणे, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !