२ ऑगस्टला घटनापीठ करणार कलम ३७० च्या विरोधातील याचिकांवर सुनावणी
नवी देहली – जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या समर्थनार्थ काश्मिरी हिंदूंनी सर्वोच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट केल्या आहेत. ‘कलम ३७० हटवल्याचा विरोध करण्यासाठी प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळण्यात याव्यात’, अशी यात मागणी करण्यात आली आहे.
Kashmiri Pandit’s Body moves Supreme Court in support of abrogation of Article 370#Law #Latest #LatestLaws #LegalNews #India #IndianNews #News #Legal #Kashmiris #Kashmir #SupremeCourt #Article370 https://t.co/JI1EgFILjq
— LatestLaws.com (@latestlaws) July 28, 2023
येत्या २ ऑगस्ट या दिवशी घटनापीठ कलम ३७० रहित करण्याच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते वीरेंदर कौल यांनी कलमाच्या समर्थनार्थ याचिका प्रविष्ट केली आहे.