(म्हणे) ‘राज्यातील दंगलींमधील निष्पाप आरोपींवरील गुन्हे मागे घ्या !’ – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर यांची प्रशासनाला सूचना

कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील डी.जे. हळ्ळी, के.जी. हळ्ळी, शिवमोग्गा, हुब्बळ्ळी आदी ठिकाणी गेल्या काही वर्षांत झालेल्या दंगलींमध्ये निष्पाप युवक, तसेच विद्यार्थी यांना खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हे खटले पुन्हा पडताळून नियमानुसार निष्पाप लोकांवरील गुन्हे मागे घ्या’, अशी सूचना गृहमंत्री परमेश्‍वर यांनी दिली आहे. काँग्रेसचे आमदार तन्वीर सेठ यांनी केलेल्या मागणीनंतर त्यांनी ही सूचना केली.

मुसलमानांच्या लांगूलचालनाचा प्रयत्न ! – भाजपची टीका

याविषयी भाजपचे नेते यत्नाळ बसनगौडा पाटील ट्वीट करत म्हटले की, हे आरोपी पोलिसांवर दगडफेक, पोलीस ठाण्याला आग लावणे आणि दंगल करणारे आहेत. पूर्वी याच काँग्रेस शासनाने पी.एफ्.आय.च्या गुंडांविरुद्धची प्रकरणे मागे घेऊन राज्यात अशांत वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले होते.

कुणाच्या तरी आशीर्वादाने सत्तेवर आले असल्याचे सांगणार्‍या गृहमंत्र्यांनी आता मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी हे मुर्खपणाचे कार्य हाती घेतले आहे, अशी टीका केली.

आरोपींना शिक्षा होईपर्यंत सरकारने नाक खुपसू नये ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनीही ट्वीट करत, ‘या दंगलींमागे धर्मांध शक्तींचा हात असून प्रामाणिक अशी न्यायालयीन चौकशी होऊन न्यायालयाची प्रक्रिया संपेपर्यंत, अपराध्यांना शिक्षा होईपर्यंत या प्रकरणात राज्य सरकारने नाक खुपसू नये’, अशा शब्दांत खडसावले आहे.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकातील दंगली या धर्मांध मुसलमानांनी केल्या आणि त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना अटकही झाली आहे. आता काँग्रेस सरकार अशी सूचना देऊन त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून स्पष्ट होते !
  • ‘काँग्रेसचे राज्य म्हणजे दंगलखोर धर्मांधांचे राज्य’ असेच आता म्हणावे लागेल !
  • काँग्रेस सत्तेवर आल्यावर ती मुसलमानांचे लांगूलचालनासाठी धर्मनिरपेक्षता, जनता काय म्हणेल ? हिंदू काय म्हणतील ? यांचा विचार न करता थेट निर्णय घेते; मात्र हिंदूंच्या बाजूने कोणताही राजकीय पक्ष थेट निर्णय घेत नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव !