सहस्रो शिक्षकांच्‍या दुबार नोंदणीवर कार्यवाही करणार !

पुणे – राज्‍यातील ४ सहस्र ७१८ शिक्षकांची ‘युडायस प्‍लस प्रणाली’वर दुबार नोंदणी आहे, असे उघड झाले आहे. दुबार नोंदणी असलेल्‍या शिक्षकांची माहिती पडताळून ‘युडायस प्‍लस प्रणाली’मध्‍ये अद्ययावत् करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या असून पुणे आणि अहमदनगर जिल्‍ह्यांतील बनावट शिक्षक भरती संदर्भातील चौकशीची कार्यवाहीही चालू केली आहे. राज्‍यामध्‍ये २०२२-२३ पासून सर्व शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांची आधार वैधतेसह माहिती ‘युडायस प्‍लस प्रणाली’मध्‍ये भरण्‍याची कार्यवाही महाराष्‍ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्‍या वतीने चालू आहे. दुबार नोंदणी असलेल्‍या शिक्षकांची माहिती पडताळून युडायस प्‍लस प्रणालीमध्‍ये अद्ययावत् करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत, असे शिक्षणमंत्री केसरकर यांनी विधिमंडळात सांगितले.