जानेवारी ते मे या कालावधीत महाराष्ट्रातील १९ सहस्र ५३३ महिला बेपत्ता ! – अनिल देशमुख, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
अनेक गोष्टींत प्रथम क्रमांक पटकावणारे आणि पुरोगामी म्हणण्यात येणारे महाराष्ट्र राज्य महिलांसाठी मात्र असुरक्षित असणे, हे दुर्दैव !
अनेक गोष्टींत प्रथम क्रमांक पटकावणारे आणि पुरोगामी म्हणण्यात येणारे महाराष्ट्र राज्य महिलांसाठी मात्र असुरक्षित असणे, हे दुर्दैव !
राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासह केळी संशोधन केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.
बुलढाण्यामधील राजूर घाटात एक बस दरीत कोसळली. यामध्ये ५५ प्रवासी होते. यामध्ये २ विद्यार्थी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
जेथे मुलींची वसतीगृहे आहेत, तेथे महिला प्रबंधक नियुक्त करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. वसतीगृहात सुरक्षारक्षकांची नियुक्ती बाहेरील एजन्सींकडून करण्यात येते.
प्रशासनाचा भोंगळ कारभार ! वेळ मारून नेणारी उपाययोजना केल्याने एक समस्या सोडवतांना दुसर्या समस्या निर्माण !
गावात वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी नादुरुस्त असल्याचे कारण महावितरणकडून दिले जाते; मात्र पावसाळ्यापूर्वी वीजवाहिनीवर आलेली झाडे, झुडपे कापली गेली नाहीत. त्यामुळे विजेची समस्या उद्भवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यापुढे राज्यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी समयमर्यादा निश्चित करण्यात येईल. त्याविषयीचे विधेयक सभागृहात आणले जाईल. जे प्रकल्प वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या विकासकांना पालटण्याची तरतूद करण्यात येईल, असे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
नागपूर विभागात ९५७, अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, तर मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्यात आली.
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अपंगत्व निवृत्तीवेतन देण्यात आले होते; परंतु वर्ष १९७१ मध्ये जालंधर सेना रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांचे अपंगत्व २० टक्क्यांहून अल्प असल्याचे सांगत त्यांचे अपंगत्व निवृत्तीवेतन बंद करण्यात आले होते.
गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने सरकारी पाहुणे मोठ्या संख्येने गोव्यात येतात आणि पाहुणचार घेतात. ‘या सरकारी पाहुण्यांसाठी मेजवान्या आयोजित केल्या जातात’, अशी माहिती समोर आली आहे.