मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – जानेवारी ते मे २०२३ या कालावधीत राज्यातील १९ सहस्र ५३३ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २५ जुलै या दिवशी औचित्याचा सूत्राखाली सभागृहात निदर्शनास आणून दिली. ही शासकीय आकडेवारी असल्याचे सांगून याविषयी गृहविभागाने उत्तर देण्याची मागणी देशमुख यांनी केली. कायदा आणि सुव्यवस्था चर्चेच्या वेळी सभागृहात गृहमंत्री यावर बोलण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पाच महिन्यांमध्ये 19,533 मुली आणि महिला बेपत्ता, अनिल देशमुखांची माहिती@AnilDeshmukhNCP @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis https://t.co/a6PzcH10TO
— My Mahanagar (@mymahanagar) July 25, 2023
संपादकीय भूमिकाअनेक गोष्टींत प्रथम क्रमांक पटकावणारे आणि पुरोगामी म्हणण्यात येणारे महाराष्ट्र राज्य महिलांसाठी मात्र असुरक्षित असणे, हे दुर्दैव ! |