मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – यापुढे राज्यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी समयमर्यादा निश्चित करण्यात येईल. त्याविषयीचे विधेयक सभागृहात आणले जाईल. जे प्रकल्प वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या विकासकांना पालटण्याची तरतूद करण्यात येईल, असे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. २५ जुलै या दिवशी विधानसभेत महाराष्ट्र झोपडपट्टी विधेयक २०२३ हे सुधारित विधेयक सभागृहात मांडतांना मंत्र्यांनी वरील आश्वासन दिले.
#विधानसभा_लक्षवेधी
मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या झोपड्यांचे हस्तांतरण, विक्रीबाबतच्या अडचणींसंदर्भातील समस्यांबाबत लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सर्वंकष धोरण निश्चित करण्यात येईल- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे pic.twitter.com/tBohoIWKZb— AIR News Pune (@airnews_pune) July 22, 2023