बृहन्‍मुंबईत २९ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश !

बृहन्‍मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी २९ जुलै २०२३ पर्यंत पोलीस उपआयुक्‍त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. ५ किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींचा जमाव करणे, मिरवणूक काढणे, जमाव करून ध्‍वनीवर्धकाचा वापर करणे, फटाके फोडणे यास आदेशानुसार प्रतिबंध घालण्‍यात आला आहे. 

जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ आंबेगाव (पुणे) येथे निषेध मोर्चा !

जैन समाजाचे तपस्‍वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमारनंदीजी महाराज यांच्‍या कर्नाटकातील आश्रमात घुसून समाजकंटकांनी त्‍यांची हत्‍या केली होती, तसेच त्‍यांच्‍या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करून ‘बोअरवेल’मध्‍ये फेकले.

जैन साधूंच्‍या निर्घृण हत्‍याकांडाच्‍या निषेधार्थ मुंबई आणि लासलगाव येथे मौन फेरी

जैन समाजाचे विद्वान तपस्‍वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांच्‍या निर्घृण हत्‍येच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील भुलेश्‍वर परिसरात असलेल्‍या गुलालवाडी मंदिर येथे, तसेच लासलगाव येथे मौन फेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. मोठ्या संख्‍येने जैन समाज यात सहभागी झाला होता.

सोलापूर जिल्‍हा परिषदेमध्‍ये पदमान्‍यतेसाठी शिक्षणाधिकारी घेतात ८ लाख रुपये !

शिक्षण विभाग पुणे उपसंचालक कार्यालय आणि सोलापूर जिल्‍हापरिषद शिक्षणाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचार चालू आहे. चौकशी समिती नेमून येथील शिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करणार का ?

अखेर मुंबईत पाणी साठलेच !

गोरेगाव, अंधेरी, जोगेश्‍वरी येथे रस्‍ते जलयम झाले. शीव आणि चेंबूरमध्‍येही पाणी साचले होते. किंग्‍ज सर्कल, मिलन सबवे येथेही प्रतीवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

पुणे येथे चित्रपटगृहात महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या २ धर्मांधांसह एकाला अटक !

‘मगरपट्टा सिटी’तील चित्रपटगृहात महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्‍या पतीने तिघांना खडसावले. तेव्‍हा आरोपींनी पतीला शिवीगाळ करून धमकावले. या प्रकरणी महिलेच्‍या पतीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पसार झालेले महंमद आदिल, अफजल अली आणि अन्‍य एकाला अटक करण्‍यात आली आहे.

इरशाळवाडीतील बाधितांना सिडकोच्‍या माध्‍यमातून कायमस्‍वरूपी घरे देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

इरशाळवाडीमधील बाधित कुटुंबियांची तात्‍पुरती कंटेनरमध्‍ये व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या सर्व कुटुंबांची कायमस्‍वरूपी निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे.

पुणे येथील ‘रुबी हॉल’ मूत्रपिंड प्रत्‍यारोपण प्रकरणी ‘उच्‍चस्‍तरीय चौकशी समिती’ नेमली !

रुबी हॉल रुग्‍णालयातील मूत्रपिंड प्रत्‍यारोपण प्रकरणी राज्‍य सरकारने ‘उच्‍चस्‍तरीय चौकशी समिती’ नेमली आहे. या समितीच्‍या अध्‍यक्षपदी उच्‍च न्‍यायालयाचे निवृत्त न्‍यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांच्‍या आश्रमात ‘ऋग्‍वेद संहिता स्‍वाहाकार महायज्ञ’ पार पडला !

गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी आश्रमात ऋग्‍वेद संहिता स्‍वाहाकार महायज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. सातारा येथील वेदशास्‍त्रसंपन्‍न श्री. गोविंदशास्‍त्री जोशी यांच्‍या अधिपत्‍याखाली हा सोहळा पार पडला. 

पाकच्‍या ‘आय.एस्.आय.’शी संबंध असणारे ३ जण अटकेत !

आतंकवाद रोखण्‍यासाठी सरकारने आतंकवाद्यांना जरब बसेल, अशी कारवाई करणे आवश्‍यक आहे !