अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करून तिची हत्‍या करणार्‍यास सातारा न्‍यायालयाकडून फाशीची शिक्षा !

गुन्हेगाराला ताब्यात घेऊन जाणारे पोलीस कर्मचारी

सातारा – ८ वर्षांच्‍या मुलीवर बलात्‍कार करून तिची हत्‍या केल्‍याच्‍या प्रकरणी पाटण तालुक्‍यातील रुवले येथील संतोष चंद्रू थोरात (वय ४१ वर्षे) याला सातारा जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २९ डिसेंबर २०२१ या दिवशी घडली होती. (केवळ फाशीची शिक्षा सुनावली एवढे पुरेसे नसून संबंधित आरोपीस उच्‍च न्‍यायालय, सर्वोच्‍च न्‍यायालय आणि राष्‍ट्रपती या पुढील पर्यायांमधून जाऊन त्‍याला प्रत्‍यक्षात फाशी कधी होणार ?, हे पाहिले पाहिजे.   यापूर्वीच्‍या अनेक घटनांमध्‍ये फाशी घोषित होऊन १०-१० वर्षे किंवा त्‍यापेक्षा अधिक कालावधी उलटल्‍याच्‍या घटना आहेत. त्‍यामुळे अशा घटना न होण्‍यासाठी कठोर शिक्षा आणि त्‍याची तात्‍काळ कार्यवाही हेही महत्त्वाचे आहे !- संपादक) 

पीडित मुलगी आरोपीच्‍या घरासमोर खेळत होती. संतोषने तिला चॉकलेटचे आमीष दाखवून निर्जनस्‍थळी नेऊन बलात्‍कार केला. तिची गळा आवळून हत्‍या केली. झुडपात मृतदेह फेकला. रात्रीपर्यंत मुलगी घरी न आल्‍याने नातेवाइकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी संतोष याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.