मुंबई – राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना खंडणीसाठी जिवे मारण्याची वारंवार धमकी देणार्या प्रदीप भालेकर या संशयितावर मलबारहिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
तो मंत्री केसरकर यांना आणि त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील कार्यालयात संपर्क करून धमकी देत असे अन् खंडणीची मागणी करत असे. यापूर्वी राज्याचे अन्न आणि प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनाही अशा स्वरूपाची धमकी दिली होती.
(जेथे कडक सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या मंत्र्यांनाच जीवे मारण्याची आणि खंडणीसाठी धमकी दिली जात असेल, तेथे संरक्षण नसलेल्या सर्वसामान्य जनतेची काय स्थिती असेल, याचा विचार न केलेला बरा ! – संपादक)