मुंबई – छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी राज्यशासनाकडून १०० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या समोर विश्वासनगर लेबर कॉलनी येथे हे स्मारक उभारण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी ५० लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.