अचलपूर (जिल्‍हा अमरावती) येथे महाविद्यालयातील फलकावर हिंदु धर्मविरोधी सुविचार !

सुविचार लिहिण्‍यामागील भूमिका स्‍पष्‍ट करण्‍याची बजरंग दलाची निवेदनाद्वारे मागणी

निवेदन देण्‍यासाठी एकत्र जमलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते

अमरावती, १४ जून (वार्ता.) – अचलपूर तालुक्‍यातील श्री जगदंबा महाविद्यालयातील फलकावर एक सुविचार लिहिण्‍यात आला होता. त्‍यामध्‍ये केवळ हिंदु धर्मावर टीका आणि चिखलफेक करून विद्यार्थ्‍यांच्‍या मनात धर्माविरोधी तेढ निर्माण करण्‍याचा प्रयत्न झाला. त्‍यामुळे असे सुविचार लिहू नयेत अथवा अन्‍य पंथांविषयीही अशीच माहिती विद्यार्थ्‍यांना द्यावी’, अशी मागणी करून ‘सुविचार लिहिण्‍यामागील आपली भूमिका प्राचार्यांनी सर्वांसमोर स्‍पष्‍ट करावी’, असे निवेदन बजरंग दल, अचलपूरच्‍या वतीने देण्‍यात आले. (महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थ्‍यांपैकी एकानेही या सुविचाराला विरोध का केला नाही ? – संपादक)

‘देवासाठी पैसा खर्च करू नका, तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका, जो विद्यार्थी हुशार आहे, त्‍याला तो पैसा द्या. धर्मकृत्‍य करण्‍यासाठी नाही, विद्या घेण्‍यासाठी पैसा खर्च करा’, असा तो सुविचार होता.

संपादकीय भूमिका :

धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदू संघटित नसल्‍याने हिंदु धर्मावर कुणीही येतो आणि सर्रास चिखलफेक करतो. अन्‍य धर्मियांच्‍या संदर्भात असे लिखाण करण्‍याचे कुणाचे धाडसही होणार नाही !