गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरपणे कार्यवाही करण्याची आवश्यकता सांगणारी घटना !
दौंड (जिल्हा पुणे) – येथे ईदगाह मैदान शेजारी खाटीक गल्लीतील पशूवधगृहाशेजारी जनावरे, गोवंश कत्तलीसाठी ठेवले आहेत, अशी माहिती १० जून या दिवशी प्राणिमित्रांना मिळाली. त्यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना ही माहिती दिली, तसेच प्राणिमित्र अधिकारी शादाब मुलाणी, मंगेश चिमकर, निखिल दरेकर, अहिरेश्वर जगताप, ओमकार जाधव आणि इतर सहकारी यांनी दौंड पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार खाटीक गल्ली येथे धाड टाकण्यात आली. त्या वेळी अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेल्या १६ गोवंशाची सुटका करण्यात आली आणि जनावरांच्या चरबीपासून बनवलेले १०० किलो बनावट तूप अन् जनावरांची कातडी जप्त केली. या प्रकरणी शरीफ कुरेशी याच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि मानद पशूकल्याण अधिकारी महेश भंडारी यांनी विशेष सहकार्य केले.