कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथील अपघातात ५ जण आणि १९० मेंढ्या ठार

( प्रातिनिधिक छायाचित्र )

हिंगोली – कळमनुरीपासून काही अंतरावरील माळेगावजवळ भीषण अपघातात ५ जणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच २ जण गंभीर घायाळ झाले. राजस्थानकडून हैद्राबादकडे मेंढ्यांचा हा ट्रक जात होता. २५ मे च्या पहाटे हा अपघात झाला. ट्रकचालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभ्या असलेल्या ट्रकवर त्याचे वाहन आदळले.