‘लव्ह जिहाद’चे वास्तव हिंदु जनजागृती समिती कित्येक वर्षे मांडत आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

सावर्डे (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थितांना संबोधित करतांना श्री. किरण दुसे (उजवीकडे) शेजारी सौ. साधना गोडसे

सावर्डे (जिल्हा कोल्हापूर) – केरळ राज्यातून ३२ सहस्रांहून अधिक युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत. या युवती पुढे जाऊन आतंकवादी कारवायांत सहभागी होत्या. हे भयानक वास्तव ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने समोर आणले. या पूर्वीपासून कित्येक वर्षे हिंदु जनजागृती समिती हा विषय मांडत आहे. या चित्रपटात युवतींचा बुद्धीभेद कशा प्रकारे केला जातो ? याचे यथार्थ चित्रण आहे. ही वस्तूस्थिती असतांना  देशातील काही लोक या घटना खोट्या असल्याचे सांगतात. तरी या संदर्भात आपण सर्वांनी जागृत होऊन धर्मशिक्षण घेतले, तरच अशा घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते सावर्डे येथील विठ्ठल मंदिरात २२ मे या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थितांना संबोधित करतांना श्री. किरण दुसे, तसेच उपस्थित जिज्ञासू

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे यांनीही उपस्थितांचे प्रबोधन केले. या वेळी श्री. किरण दुसे यांचा सत्कार वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. मानसिंग पाटील यांनी केला, तर सौ. साधना गोडसे यांचा सत्कार सौ. सुनीता पाटील यांनी केला.

सभेसाठी उपस्थित जिज्ञासू

सभेसाठी हातभार लावणारे विठ्ठल मंदिराचे पुजारी श्री. राजेंद्र पाटील यांचा सत्कार श्री. किरण दुसे यांनी, तसेच धर्मप्रेमी श्री. प्रमोद जगताप यांचा सत्कार ह.भ.प. पिंटू लोहार यांनी केला. १०० हून अधिक धर्मप्रेमी या वेळी उपस्थित होते.