जालना येथे धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षकास लाच घेतल्याप्रकरणी अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले धर्मादाय आयुक्त !

( प्रातिनिधिक छायाचित्र )

जालना – जिल्ह्यातील देव पिंपळगाव येथील श्री भैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट फेरफार करण्यासाठी येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक धरमसिंग जंघाळे (वय ४५ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. यानंतर तक्रारदाराने याची येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर २३ मे या दिवशी यातील १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जंघाळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.