पुणे येथील ‘कॉसमॉस बँक सायबर आक्रमण’ प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षा !

कॉसमॉस बँक (संग्रहित चित्र)

पुणे – ‘कॉसमॉस बँक’ सायबर आक्रमण प्रकरणातील आरोपींना पुणे सत्र न्‍यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अटक केलेल्‍या १८ आरोपींपैकी ११ आरोपींना साडेतीन ते ४ वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली आहे. या गुन्‍हेगारांनी गणेशखिंड येथील ‘कॉसमॉस बँके’च्‍या मुख्‍यालयातील ‘सर्व्‍हर हॅक’ करून ११ ते १३ ऑगस्‍ट २०१८ या कालावधीमध्‍ये ९४ कोटी रुपये काढून घेतले होते. यातील आरोपींना महाराष्‍ट्र, राजस्‍थान, उत्तरप्रदेश येथून अटक केली होती. न्‍यायालयाने फाहीम शेख, फहीम खान, शेख जब्‍बार, महंमद सईद, युस्‍टेस वाझ, अब्‍दुल्ला शेख, बशर शेख, सलमान बेग, फिरोज शेख आदी आरोपींना शिक्षा सुनावली आहे.