शिर्डी (जिल्हा नगर) – लवकरच शिर्डी साईमंदिरात २ वर्षांपूर्वी घालण्यात आलेली हार, फुले आणि प्रसाद यांवरील बंदी हटवली जाणार आहे. यासाठी साईसंस्थानच्या तदर्थ समितीने बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साईबाबांना हार फुले वहाता येणार आहेत. कोविडमुळे साईमंदिरात हार, फुले आणि प्रसाद घेऊन जाण्यास घातलेली बंदी अद्यापही कायम आहे. बंदीमुळे शिर्डीतील शेकडो व्यावसायिक आणि परिसरात ३८४ हेक्टर क्षेत्रावर फुलशेती करणार्या शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. बंदी उठवावी या मागणीसाठी ८ मासांपूर्वी साईमंदिराच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आणि व्यावसायिक यांनी आंदोलन केले होते.