जळगाव, पाचोरा, चोपडा आणि मुक्ताईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारणार ! – पालकमंत्री

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या पर्यावरणपूरक १२१ इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाने मान्यता दिली आहे. यात पाचोरा २१, मुक्ताईनगर १७, चोपडा २१, तर इतर भागांसाठी ६२ बसगाड्या संमत झाल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

राजापूर येथे नदीपात्रात आणि उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर होणार कारवाई  !

कचरा उघड्यावर किंवा नदीपात्रात टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यापार्‍याचा व्यवसाय परवाना, हातगाडी परवाना रहित करण्यात येईल, तसेच संबंधित नागरिकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल

रत्नागिरी जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या पाणीपातळीत झाली घट

प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणार्‍या हवामान पालटास अल निनो असे म्हणतात. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानपालटाला कारणीभूत ठरतेय.

पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर यांची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट !

तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर, गांधर्व महाविद्यालयाचे निबंधक श्री. विश्‍वास जाधव आणि तबलावादक पं. अमोद दंडगे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली.

(म्हणे) ‘भारताशी युद्धाची शक्यता असल्याने पंजाबमधील निवडणूक पुढे ढकलावी !’-पाकिस्तान

भारताने जर पाकविरुद्ध युद्ध करून जिहादी आतंकवाद नष्ट केला, पाकव्याप्त काश्मीर मुक्त केले, तर भारतियांना आनंदच होईल; सरकार हे धाडस दाखवणार का ?

विदेशी नागरिकांना हिंसाचारग्रस्त सुदानमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना वेग

इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि चीन येथील प्रशासकीय अधिकारी अन् नागरिक यांना हिंसाचारग्रस्त सुदानमधून हवाईमार्गे बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती सुदानच्या सैन्याने दिली.

(म्हणे) ‘रामनवमी, हनुमान जयंती हे उत्सव दंगलींसाठीच झाले आहेत”-जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान !

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह यांची चेतावणी “आव्हाडांनी हिंदु धर्माचा अपमान चालू ठेवला, तर त्यांचे स्वागत चपलांनी करू !”

(म्हणे) ‘केवळ झाडाखाली शाळा बसवायच्या राहिल्यात !’-आमदार जितेंद्र आव्हाड

पाठ्यक्रमातून मोगलांचा इतिहास वगळण्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोटदुखी !

दर्शनासाठी ५०० रुपयांऐवजी प्रत्येकी १ लाख रुपये उकळणार्‍या मुसलमान आमदाराला अटक !

हिंदूंच्या मंदिरांच्या दर्शन तिकिटामध्ये घोटाळा करून पैसा लाटणारा मुसलमान आमदार ! हिंदूंची मंदिरे ही अशा भ्रष्ट आमदारांना घोटाळे करण्याची माध्यमे वाटतात, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम होय !

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला प्रारंभ !

उत्तराखंडमधील  चारधाम यात्रेला २२ एप्रिल, म्हणजेच अक्षय्य तृतीयेपासून प्रारंभ झाला. २१ एप्रिलपर्यंत यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.