दर्शनासाठी ५०० रुपयांऐवजी प्रत्येकी १ लाख रुपये उकळणार्‍या मुसलमान आमदाराला अटक !

  • आंध्रप्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शन तिकिटांचा घोटाळा

  • भाविकांचे आधारकार्डही बनावट

आमदार शेख साबजी

तिरुपती (आंध्रप्रदेश) – तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शन तिकिटांमध्ये गौडबंगाल असल्याचे नुकतेच समोर आले आहे. अशातच ‘आंध्रप्रदेश युनायटेड टीचर्स फेडरेशन’चे अध्यक्ष आणि विधानपरिषदेतील आमदार शेख साबजी यांचे नाव आले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. गेल्या काही काळात असे प्रथमच झाले आहे की, ‘श्रीवरि’ दर्शन तिकिटांच्या काळाबाजारात एका लोकप्रतिनिधीचे नाव समोर आले आहे.

१. देवस्थानच्या दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६ भक्तांना दर्शन मिळण्यासाठी आमदार साबजी यांनी त्यांच्याकडून ५०० रुपयांऐवजी प्रत्येकी १ लाख रुपये गोळा केले होते.

२. या माध्यमातून मिळवलेला पैसा हा आमदार साबजी यांच्या वाहनचालकाच्या बँक खात्यावर जमा झाला असल्याचा आरोप दक्षता विभागाने केला आहे.

३. २१ एप्रिलच्या सकाळी जेव्हा आमदार साबजी आणि भाविक दर्शनासाठी देवस्थानात उपस्थित झाले, तेव्हा देवस्थान अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत सर्व ६ भाविकांचे आधारकार्ड बनावट असल्याचे समोर आले. आधारकार्डांवर भाग्यनगर (हैद्राबाद) येथील निवासस्थानांचे पत्ते होते. प्रत्यक्षात सर्व भाविक हे कर्नाटकातील होते.

४. दक्षता विभागाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट केला असून आमदार साबजी यांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरांच्या दर्शन तिकिटामध्ये घोटाळा करून पैसा लाटणारा मुसलमान आमदार ! हिंदूंची मंदिरे ही अशा भ्रष्ट आमदारांना घोटाळे करण्याची माध्यमे वाटतात, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम होय ! आंध्रप्रदेशमध्ये हिंदुद्वेष्ट्या वाय.एस्.आर्. काँग्रेसची सत्ता असल्यामुळे असे प्रकार थांबतील, याची अपेक्षाच नाही !