विदेशी नागरिकांना हिंसाचारग्रस्त सुदानमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना वेग

सुदान

खार्टूम (सुदान) – इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि चीन येथील प्रशासकीय अधिकारी अन् नागरिक यांना हिंसाचारग्रस्त सुदानमधून हवाईमार्गे बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती सुदानच्या सैन्याने दिली. तेथे सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यातील सत्तासंघर्षातून उसळलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ४०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. साऊदी अरेबिया आणि जपान या देशांनीही त्यांच्या नागरिकांना सुदानमधून बाहेर काढण्यास आरंभ केला असून भारतानेही सुदानमधील ३ सहस्र भारतियांना सुरक्षित हालवण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालू करणार असल्याचे म्हटले आहे.