सिंधुदुर्ग : कालावल खाडीपात्रात वाळूच्या अवैध उत्खननाच्या ठिकाणी बंदर विभागाची धाड

कालावल खाडीपात्रातील अधिकृत वाळू उत्खनन क्षेत्राच्या बाहेर अवैधपणे दिवसरात्र वाळूचे उत्खनन केले जात आहे. यामुळे खाडीचे पात्र विस्तारत असून येथील झाडे आणि वस्ती यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा ! – मंत्री रवींद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत आणि होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

प्रतिदिन ४-५ घंटे पाणी देऊ शकत नसल्यास आम्ही प्रशासन चालवण्यास अपयशी ! – मंत्री नीलेश काब्राल, गोवा

‘‘राज्यात सरकार प्रतिदिन ४-५ घंटे पाणी देण्याचे उद्दिष्ट पुढील काही दिवसांत पूर्ण करू शकणार आहे; मात्र यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.’’

कोल्‍हापूर बसस्‍थानकातील नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर करा ! – सुराज्‍य अभियानाचे निवेदन

सध्‍या उन्‍हाळ्‍याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्‍वच्‍छ पाणी न मिळणे, हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. तरी नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर कराव्‍यात, या मागणीचे निवेदन राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कोल्‍हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्‍के यांना देण्‍यात आले.

भूखंडाअभावी दारावे ग्रामस्‍थ सामाजिक सुविधांपासून वंचित !

दारावे गावामध्‍ये कार्यक्रमासाठी समाज मंदिर, सांस्‍कृतिक भवन, महिला मंडळासाठी भवन, ज्‍येष्‍ठांसाठी विरंगुळा केंद्र, खेळण्‍यासाठी मैदान हे भूखंड सिडकोकडून मिळाले नाहीत. महापालिकेची स्‍थापना होऊन २८ वर्षे झाली, तरी ग्रामस्‍थ सामाजिक सुविधांपासून वंचित आहेत.

कुठे बालवाडीप्रमाणे मायेतील विषयांची माहिती देणारे विज्ञान, तर कुठे ईश्वरप्राप्ती करून देणारे सर्वाेच्च स्तराचे अध्यात्मशास्त्र !

विश्व : आधुनिक विज्ञान केवळ दृश्य स्वरूपातील ग्रह-तार्‍यांबद्दलच थोडीफार माहिती सांगू शकते. याउलट अध्यात्मशास्त्र सप्तलोक आणि सप्तपाताळ येथील सूक्ष्म जगताची माहिती देते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खलिस्‍तानवाद संपवा !

खलिस्‍तानी चळवळ नष्‍ट करण्‍यासाठी आता पावले उचलणार नाही, तर कधी उचलणार ? पंजाबमध्‍ये काही ठिकाणी खलिस्‍तानवाद्यांना अटक केल्‍यावर त्‍यांच्‍या चौकशीत ‘आम्‍ही हिंदुत्‍वनिष्‍ठांना लक्ष्य करणार होतो’, अशी माहिती पुढे आली आहे.

कर्नाटकमध्‍ये ‘अधिवक्‍ता संरक्षण कायदा’ त्‍वरित लागू करा ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदूंच्‍या बाजूने लढणार्‍या अधिवक्‍त्‍यांवर झालेल्‍या गोळीबारामागे सूत्रधार कोण ?’, यावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद