भूखंडाअभावी दारावे ग्रामस्‍थ सामाजिक सुविधांपासून वंचित !

मागण्‍या मान्‍य न झाल्‍यास धडक मोर्च्‍याची चेतावणी

( संग्रहीत छायाचित्र )

नवी मुंबई, १८ एप्रिल (वार्ता.) – दारावे गावामध्‍ये कार्यक्रमासाठी समाज मंदिर, सांस्‍कृतिक भवन, महिला मंडळासाठी भवन, ज्‍येष्‍ठांसाठी विरंगुळा केंद्र, खेळण्‍यासाठी मैदान हे भूखंड सिडकोकडून मिळाले नाहीत. महापालिकेची स्‍थापना होऊन २८ वर्षे झाली, तरी दारावे ग्रामस्‍थ सामाजिक सुविधांपासून वंचित आहेत. मागण्‍यांकडे सिडको आणि महानगरपालिका प्रशासन यांचे लक्ष वेधण्‍यासाठी सभा घेऊन प्रशासनाचा निषेध केला. मागण्‍या मान्‍य न झाल्‍यास दोन्‍ही प्रशासनांवर धडक मोर्चा काढण्‍यात येईल, अशी चेतावणी दारावे ग्रामस्‍थ मंडळाचे अध्‍यक्ष गणेश पाटील यांनी दिली.