फाल्गुन पौर्णिमेच्या कथा आणि इतिहास
‘प्राचीन काळी ‘हिरण्यकश्यपू’ नावाचा एक राक्षस राजा होता. हा राक्षस देवांचा मोठा वैरी होता. भगवान विष्णूचे नाव घेणे, त्याला सहन होत नसे; पण त्याचे नशीब उलटे. त्याच्याच कुळात एक देवभक्त बालक जन्मले. त्याचे नाव ‘प्रल्हाद’ ! प्रल्हाद हा अत्यंत भाविक राजपुत्र होता. तो भगवंताचा जप करी.