१. वैयक्तिक अडचणींमुळे विचार वाढले असतांना स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन होऊन आनंद होणे
‘मागील काही दिवसांपासून माझ्या मनात स्वतःच्या वैयक्तिक समस्यांविषयी पुष्कळ विचार येत होते. तेव्हा एकदा रात्री स्वप्नात मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले. हनुमान प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणांशी दास्यभावात बसतो, तशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणांशी बसून त्यांचे चरण घट्ट पकडून ठेवले होते. तेव्हा त्या आईच्या मायेने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला चैतन्य आणि शक्ती प्रदान करत होत्या. मला त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि शक्ती सहन न झाल्यामुळे मी डोळे मिटून केवळ ‘सद्गुरु ताई, सद्गुरु ताई’, असे म्हणत होते.
सकाळी जाग आल्यावर माझे मन प्रसन्न असल्यामुळे मला हसू येऊन आनंद अनुभवता येत होता. ही आनंदावस्था चिकित्सालयात सेवा करतांनाही दिवसभर टिकून होती.
२. साधिकेला त्रस्त स्थितीतून बाहेर काढून आनंद देणार्या कृपावत्सल श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ !
मी जीवनात हताश होते, विचार आणि माया यांत अडकून त्रस्त होते, तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ मला आधार अन् प्रेम देऊन त्या स्थितीतून बाहेर काढतात. त्या माझ्यासारख्या पामर जिवासाठी जगण्यासाठी, साधना आणि सेवा करण्यासाठी चैतन्य अन् शक्ती देतात.’ ही त्यांची माझ्यावर असलेली कृपाच आहे.
याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
३. प्रार्थना
माझी काहीच पात्रता नसतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ माझे रक्षण करून माझ्याकडून साधना अन् सेवा करून घेत आहेत; परंतु मी त्यांना अपेक्षित अशी साधना आणि सेवा करायला न्यून पडत आहे. त्यासाठी मी त्यांच्या चरणी शरणागतीने क्षमायाचना करून प्रार्थना करते, ‘माझ्या जीवनात कितीही प्रतिकूल प्रसंग आले, तरी आपण मला आपल्या चरणांशी दृढ ठेवावे.’
– कु. सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.८.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |