नैसर्गिक रंग बनवून पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश !

वाशिम – येथील एस्.एम्.सी. इंग्लिश शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वसंत ऋतूत बहरणारी विविध पाने आणि फुले यांपासून नैसर्गिक रंग बनवून पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश दिला आहे. शाळेच्या प्रांगणात नैसर्गिक रंगनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी एन्.सी. गोंडाने यांनी विद्यार्थ्यांना ‘नैसर्गिक रंगाचे लाभ आणि रासायनिक रंगांचे अपाय’ समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पाना-फुलांपासून नैसर्गिक रंग करून ते रंगपंचमीला वापरण्याची शपथ घेतली आहे.

संपादकीय भूमिका 

वाशिम येथील एस्.एम्.सी. इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य प्रयत्न !