बांगलादेशातील ऑक्सिजन प्रकल्पातील भीषण स्फोटात ६ ठार; ३० घायाळ
येथील चित्तगावच्या सीताकुंडा परिसरात ४ मार्च या दिवशी दुपारी ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर घायाळ झाले आहेत.
येथील चित्तगावच्या सीताकुंडा परिसरात ४ मार्च या दिवशी दुपारी ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर घायाळ झाले आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. प्रचाराच्या काळात धर्माचा उल्लेख करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
‘व्यसनाची होळी’ जागतिक व्यसनमुक्ती दिनाला का आयोजित केली जात नाही ? होळीच्याच दिवशी असे प्रकार का ? असे केल्यास या सणाला ‘होळी’ म्हणणे योग्य ठरेल का ?
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे भारताच्या विरोधात अनेक फलक लावण्यात आले आहेत. तेथे संयुक्त राष्ट्रांचा मानवाधिकार आयोग, आयटीयू, जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांची कार्यालये असलेल्या प्रसिद्ध चौकातच हे भारतविरोधी फलक अगदी नीट लक्षात येतील, अशा प्रकारे लावण्यात आले आहेत.
हिंदु संस्कृतीमध्ये असलेल्या प्रत्येक सणाला ‘अध्यात्मशास्त्रीय’ महत्त्व आहे. अशा महान हिंदु संस्कृतीला पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण कुठे तरी विसरत चाललो आहोत. त्यामुळे सणांचे पाश्चात्त्यीकरणासमवेत बाजारीकरणही होत आहे.
नैतिकतेचा र्हास झाल्याने विनाशाकडे वाटचाल करणारी आजची तरुणाई !
येथील पूर्वेकडील एका घरात दुपारी लागलेल्या भीषण आगीत अग्नीशमन दलाचे २ कर्मचारी घायाळ झाले आहेत; पण केवळ ‘पीपीई किट’मुळे त्यांचे प्राण वाचले आणि अनर्थ टळला. सुदैवाने या घरात कुणी नसल्याने अनर्थ टळला.
महिला जागृती सप्ताहाच्या निमित्ताने ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर आणि हिमालया आस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथळी येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नसतांनाही रुग्णांवर उपचार करणारा बोगस आधुनिक वैद्य इस्लाम हबीब सिद्धीकी याला मानखुर्द येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.
बाडमेर (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’