सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९०
‘अमेरिकन कर्करोग सोसायटी’ आणि ‘बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’, या संस्थांनी केलेल्या एका संशोधनातून ‘बागकाम करणार्यांच्या तणावात आणि चिंतेच्या पातळीत लक्षणीय घट होते’, असा निष्कर्ष काढला आहे. ‘घरच्या घरीच भाजीपाला पिकवल्याने अधिक तंतूमय पदार्थ खाल्ले जातात आणि शारीरिक श्रमही अधिक होतात अन् याचा परिणाम म्हणून कर्करोग आणि जुनाट आजारांचा धोका अल्प होऊन मानसिक आरोग्यही सुधारते’, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. जानेवारी २०२३ च्या ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’च्या अंकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. सध्याच्या ताणतणावाच्या आणि धकाधकीच्या दिनक्रमामध्ये काही काळ तरी झाडांच्या समवेत घालवून स्वतःच्या तणावमुक्तीसाठी लागवडीचा लाभ करून घ्यावा.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२२.२.२०२३)
‘तुम्ही लागवडीतील आनंद कसा अनुभवला ?’, ते कळवा.
ई-मेल : [email protected]