अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालवण्यास देऊ नये ! – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत.
अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने उपस्थिती लावली आहे. याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा आणि फळबाग पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे
ज्यांना ‘छत्रपती संभाजीनगर’ मान्य नाही, अशा औरंग्याच्या औलादींनी आपले गाठोडे बांधून पाकिस्तानात चालते व्हावे. येथे तुमची मस्ती चालणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन भाजपचे तुषार भोसले यांनीकेले
नुकतेच शिरोळ येथे दोन वरिष्ठ पातळीवरील अधिकार्यांना १ लाख ७५ सहस्र रुपयांच्या लाचेच्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्या पूर्वी ४ दिवसांपूर्वीच कोल्हापूर महापालिकेतील एका विभागाच्या प्रमुखास भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक झाली आहे.
राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत असलेल्या कर्मचार्यांसाठी जुनी सेवानिवृत्त योजना बंद करून अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली. यामुळे कर्मचार्यांना अपेक्षित लाभ होत नाही. त्यामुळे परत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचार्यांनी ४ मार्च या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
‘शिवाजी ट्रेल संस्था’ आणि ‘किल्ले भोरगिरी संवर्धन समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा’ भोरगिरीच्या भोरगडावर २६ फेब्रुवारी या दिवशी पार पडला. शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपूजेचे हे २७ वे वर्ष आहे.
प्रत्येक कवी, साहित्यिक आणि संशोधक यांच्या मनातील चिरंतन संशोधनाचे हे विषय बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून सहज सुलभ, तसेच सोप्या पद्धतीने ग्रामीण भाषेत मांडले. अनेक अभ्यासक्रमात अभ्यासल्या जात असलेल्या या कविता मराठी साहित्यात दीपस्तंभ ठरल्या आहेत, असे मत कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.
कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश निवडणूक अधिकार्यांनी दिला आहे.
वाराणसी येथील अस्सी घाट ते सिगरा, लहरतारा, घंटीमिल आदी भागांत अनेक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यावर हिंदु राष्ट्राची मागणी करण्यात आली आहे. ही भित्तीपत्रके बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थकांनी लावल्याचे म्हटले जात आहे.
‘अरब न्यूज’च्या वृत्तानुसार सौदी अरेबिया त्याच्या विश्वविद्यालयांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन योगासने शिकवण्याची सिद्धता करत आहे. आरोग्य चांगले रहाण्यासाठी योगाभ्यासाच्या महत्त्वावर जोर देण्यात येत आहे.