छत्रपती संभाजीनगर मान्य नसणार्‍यांनी पाकिस्तानात चालते व्हावे ! – आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख

भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले

मुंबई – ज्यांना ‘छत्रपती संभाजीनगर’ मान्य नाही, अशा औरंग्याच्या औलादींनी आपले गाठोडे बांधून पाकिस्तानात चालते व्हावे. येथे तुमची मस्ती चालणार नाही. लक्षात ठेवा, मोगलांचे थडगे बांधण्याची ताकद हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र ठेवतो, असे रोखठोक प्रतिपादन भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी ५ मार्च या दिवशी येथे केले. ‘छत्रपती संभाजीनगर शहराचे नामांतर पुन्हा औरंगाबाद करावे’, या मागणीसाठी ‘एम्.आय.एम्.’च्या वतीने खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ मार्चपासून साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर भोसले यांनी हे वक्तव्य केले आहे.