‘११.१०.२०२२ या दिवशी (आश्विन कृष्ण द्वितीयेला) माझा वाढदिवस होता. त्या दिवशी सकाळपासूनच मला संतांचे दर्शन होत होते आणि त्यांचे आशीर्वाद मला लाभले. त्यांच्या आणि सच्चिदांनद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतांना मला पुढे दिलेले काव्य स्फुरले. ते श्री गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.’
दिन आज असा आला ।
ईश्वरच मज विविध रूपे भेटला ॥ १ ॥
कृपाप्रसाद मज दिधला ।
गुरूंनी मजवरी चैतन्याचा वर्षाव केला ॥ २ ॥
उगवता गगनी नारायण (टीप १) हनुमंत दास (टीप २) भेटला ।
तयाने प्रीतीप्रसाद मज दिधला ॥ ३ ॥
मम मनीची व्याकुळता जाणता ।
देसाई मातपिता (टीप ३) रूपे प्रेमात मज बांधिला ॥ ४ ॥
धन्यधन्य ते चरण सद़्गुरूंचे (टीप ४) ।
चरणस्पर्श भाग्य मज दिधले ॥ ५ ॥
दिन अजि ऐसा आला ।
भाग्यसूर्य आज तळपला ॥ ६ ॥
ठेविले ऐशा स्थानी ।
जेथ ईश्वर संतरूपे तद़्रूप होई ॥ ७ ॥
भाग्य लाभले मज भूवैकुंठी (टीप ५) ।
श्रीक्षेत्री आश्रयदाता भेटी ॥ ८ ॥
म्हणे ओढ तुजला असे ।
भगवंत तळमळ पाहे ॥ ९ ॥
श्री गुरूंचा (टीप ६) कृपाप्रसाद लाभला वाढदिनी ।
कृतज्ञता कैसी व्यक्त करू मी या दिनी ॥ १० ॥
प्रेमभरे बांधले मज श्री गुरूंनी ।
स्मरण गुरुचरणांचे राहो आजीवनी ॥ ११ ॥
ऐसी प्रार्थना करोनी गुरुचरणी ।
शरणागती मागतसे तव चरणी ॥ १२ ॥
टीप १ – सूर्यनारायण
टीप २ – प.पू. दास महाराज हे हनुमंताचे भक्त आहेत.
टीप ३ – पू. देसाईआजोबा आणि पू. देसाईआजी
टीप ४ – सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका
टीप ५ – रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला महर्षींनी ‘भूवैकुंठ’ या नावाने गौरविले आहे.
टीप ६ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |