बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८.१.२०२३ या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे सूक्ष्म-परीक्षण !

‘गेल्‍या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने भारतातील विविध राज्‍यांमध्‍ये हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभांचे आयोजन केले जाते. देवाच्‍या कृपेने ८.१.२०२३ या दिवशी बांदा, जिल्‍हा सिंधुदुर्ग येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या अशाच प्रकारच्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला उपस्‍थित रहाण्‍याची मला संधी मिळाली. तेव्‍हा देवाच्‍या कृपेने हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे माझ्‍या लक्षात आलेले आध्‍यात्मिक महत्त्व देत आहे. ३१ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभांतून प्रक्षेपित होणारे विविध प्रकारचे घटक, त्‍यांचे प्रमाण आणि महत्त्व, सभांतील विविध स्‍तरांतून प्रक्षेपित होणारे पंचतत्त्वांचे प्रमाण’, ही सूत्रे वाचली. आज त्‍या पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी लिंक वर करा : https://sanatanprabhat.org/marathi/650146.html

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

५. सभेला उपस्‍थित असणार्‍या हिंदूंना स्‍थळ आणि काळ यांचा विसर पडणे :

५ अ. सिभेच्‍या ठिकाणी धर्मलोकाचे वायुमंडल सूक्ष्मातून निर्माण झाल्‍यामुळे सभेला उपस्‍थित असणार्‍यांनाही ‘आपण पृथ्‍वीवर नसून धर्मलोकात आहोत’, असे जाणवणे : हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रवेशद्वारापासून व्‍यासपिठापर्यंत सात्त्विकता, धर्मशक्‍ती आणि चैतन्‍य यांच्‍या लहरी पुष्‍कळ प्रमाणात पसरल्‍या होत्‍या. या ठिकाणी लावलेल्‍या निळ्‍या रंगाच्‍या कनातींमध्‍ये विष्‍णुतत्त्वाच्‍या सूक्ष्म लहरी कार्यरत होऊन त्‍या वातावरणात पसरत होत्‍या. त्‍यामुळे धर्मजागृती सभेच्‍या ठिकाणाचे आध्‍यात्मिक स्‍तरावर शुद्धीकरण होऊन तेथील वातावरण भक्‍तीमय झाले होते. त्‍यामुळे सभेच्‍या ठिकाणी धर्मलोकाचे (उच्‍च स्‍वर्गलोक आणि महर्लोक यांच्‍या मध्‍ये ‘धर्मलोक’ आहे.) केशरी रंगाचे वायुमंडल सूक्ष्मातून निर्माण झाले होते. धर्मतत्त्वाने भारित झालेल्‍या वायुमंडलात प्रवेश केलेल्‍या प्रत्‍येक हिंदूच्‍या मनामध्‍ये राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍याप्रती पुष्‍कळ आदर, आत्‍मीयता आणि अभिमान जागृत झाला होता. एखाद्या जागृत देवस्‍थानामध्‍ये कार्यरत असलेल्‍या चैतन्‍यापेक्षाही हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या ठिकाणी चैतन्‍य कार्यरत झाले होते. त्‍यामुळे या सभेला उपस्‍थित असणार्‍या अनेक हिंदूंवर सूक्ष्मातून पुष्‍कळ प्रमाणात आध्‍यात्मिक उपाय होऊन त्‍यांना होणारे पूर्वज आणि वाईट शक्‍ती यांचे त्रास ५० ते ७० टक्‍के इतक्‍या प्रमाणात न्‍यून झाले.  त्‍यामुळे सभेला उपस्‍थित असणार्‍या सर्वसामान्‍य हिंदूलाही स्‍थळाचा विसर पडल्‍यामुळे ‘आपण पृथ्‍वीवर नसून धर्मलोकात आहोत’, असे जाणवते.

५ आ. सभेच्‍या ठिकाणी त्रेतायुगाचे कालचक्र सूक्ष्मातून कार्यरत झाल्‍यामुळे सभेला उपस्‍थित असणार्‍या सर्वसामान्‍य हिंदूलाही काळाचा विसर पडल्‍यामुळे ‘आपण कलियुगात नसून त्रेतायुगात आहोत’, असे जाणवणे : हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचा विषय हिंदु राष्‍ट्राची म्‍हणजे रामराज्‍य स्‍थापनेचा विषय असल्‍यामुळे सभेच्‍या ठिकाणी त्रेतायुगाचे कालचक्र कार्यरत होते. त्‍यामुळे संपूर्ण पृथ्‍वीवर कलियुगाचे कालचक्र कार्यरत असतांना हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या ठिकाणी मात्र त्रेतायुगाचे भावमय, चैतन्‍यमय आणि आनंददायी कालचक्र अनुभवण्‍यास मिळते. त्‍यामुळे सभेला उपस्‍थित असणार्‍या सर्वसामान्‍य हिंदूलाही काळाचा विसर पडल्‍यामुळे ‘आपण कलियुगात नसून त्रेतायुगात आहोत’, अशी अनुभूती येते.

६. हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला आलेल्‍या हिंदूना पुढील स्‍तरांवर लाभ होणे

७. ८ जानेवारी २०२३ या दिवशी बांदा येथे झालेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे सूक्ष्म परीक्षण  

 

कु. मधुरा भोसले

७ अ. महनीय वक्‍त्‍यांनी धर्मविरांचा सत्‍कार करणे : हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला उपस्‍थित असणार्‍या महनीय वक्‍त्‍यांनी धर्मविरांचा सत्‍कार केला. तेव्‍हा धर्मविरांच्‍या रूपाने धर्मतत्त्वाचा सत्‍कार झाल्‍यामुळे धर्मविरांमध्‍ये विराजमान असणारे धर्मतत्त्वाच्‍या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण झाले. तेव्‍हा वातावरणात स्‍थुलातून धर्मगंधाचा सुगंध दरवळत होता. यावरूनच हिंदु जनजागृती समितीद्वारे आयोजित केलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेमध्‍ये भगवंतापासून निर्माण झालेले दिव्‍य धर्मतत्त्व सूक्ष्मातून कार्यरत असते, याची प्रचीती आली.

७ आ. व्‍यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्‍यातून धर्मतेज प्रक्षेपित होणे : व्‍यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्‍यातून धर्मतेजाच्‍या केशरी रंगाच्‍या तेजोमय किरणांचे वातावरणात प्रक्षेपण होऊन उपस्‍थित हिंदूंच्‍या मनावरील त्रासदायक आवरण दूर होऊन त्‍यांच्‍या हृदयातील सुप्‍तावस्‍थेतील धर्मप्रेम जागृत झाले.

७ इ. हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या मैदानावर पाताळातील वाईट शक्‍तींनी आक्रमण करणे आणि भगवान श्रीकृष्‍णाने सुदर्शनचक्र सोडून त्‍यांचे आक्रमण परतवून लावणे अन् हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या मैदानाच्‍या भोवती संरक्षककवच निर्माण करणे : हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला विरोध करण्‍यासाठी पाताळातील वाईट शक्‍तींनी धर्मसभेच्‍या मैदानावर सूक्ष्मातून आक्रमण केले. तेव्‍हा भूमीतून काळ्‍या रंगाचे भाले वर आल्‍याचे दिसले. तेव्‍हा धर्मसभेच्‍या व्‍यासपिठावरील वक्‍त्‍यांच्‍या मागे सूक्ष्मातून उपस्‍थित असणार्‍या सुदर्शनचक्रधारी भगवान श्रीकृष्‍णाच्‍या हातातून सुदर्शनचक्र सुटले आणि ते मैदानाच्‍या मधोमध वेगाने फिरू लागले. तेव्‍हा या सुदर्शनचक्रातून मारक शक्‍तीचे लाल रंगाचे किरण आणि निर्गुण-सगुण स्‍तरावरील चैतन्‍याची पिवळ्‍या रंगाची वलये मैदानावर पसरली. मारक शक्‍तीच्‍या किरणांचा आघात पाताळातून आलेल्‍या काळ्‍या भाल्‍यांवर होऊन ते नष्‍ट झाले आणि चैतन्‍याची वलये मैदानात पसरल्‍यामुळे सभेला उपस्‍थित असणारे धर्माभिमानी श्रोते, साधक, वक्‍ते आणि संत यांच्‍याभोवती अभेद्य संरक्षककवच निर्माण होऊन त्‍यांचे वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण झाले.

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

७ ई. हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या महनीय वक्‍त्‍यांवर पाठच्‍या दिशेने त्रासदायक काळ्‍या रंगाच्‍या लहरींचा प्रवाह येणे आणि व्‍यासपिठाच्‍या मागे लावलेल्‍या एका फ्‍लेक्‍सवरील नटराजाच्‍या चित्रातून पांढर्‍या रंगाच्‍या लहरी प्रक्षेपित होऊन महनीय वक्‍त्‍यांचे रक्षण होणे : हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या व्‍यासपिठाच्‍या मागून पुष्‍कळ प्रमाणात त्रासदायक काळ्‍या रंगाच्‍या लहरींचा प्रवाह महनीय वक्‍त्‍यांच्‍या पाठीमागून आल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर मधे-मधे त्रासदायक काळे आवरण वाढत होते. (सभेनंतर स्‍थानिक साधकांनी दिलेल्‍या माहितीनुसार व्‍यासपिठाच्‍या मागील इमारतीच्‍या मागे स्‍मशान होते. – संकलक) तेव्‍हा व्‍यासपिठाच्‍या मागे असणार्‍या इमारतीवर स्‍थुलातून लावलेल्‍या एका फ्‍लेक्‍सवरील नटराजाच्‍या चित्रातून शिवतत्त्वाच्‍या पांढर्‍या रंगाच्‍या लहरी वक्‍त्‍यांच्‍या दिशेने प्रक्षेपित होऊन त्‍यांच्‍याभोवती संरक्षककवच निर्माण झाले.

७ उ. पाताळातील वाईट शक्‍तींनी आकाशतत्त्वाच्‍या स्‍तरावर आक्रमण केल्‍यामुळे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला होणारा विद्युत प्रवाह काही वेळ खंडित होणे आणि सनातनचे संत सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी हनुमंताला प्रार्थना करून आध्‍यात्मिक उपाय केल्‍यावर वीजपुरवठा पुन्‍हा चालू होणे : सभेच्‍या प्रथम वक्‍त्‍या सद़्‍गुरु (कु.) स्‍वाती खाडये यांच्‍या मार्गदर्शनाच्‍या वेळी पाताळातील वाईट शक्‍तींनी आकाशतत्त्वाच्‍या स्‍तरावर आक्रमण केल्‍यामुळे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला होणारा विद्युत प्रवाह काही वेळ खंडित झाला आणि त्‍यामुळे सभेत व्‍यत्‍यय आला. तेव्‍हा मी देवाला यावरील उपाय विचारल्‍यावर देवाने मला पुढील उपाय सांगितला. ‘सभेला उपस्‍थित असणारे सनातनचे संत सद़्‍गुरु श्री. सत्‍यवान कदम यांनी हनुमंताला प्रार्थना करून सूक्ष्मातून सभेच्‍या चारही दिशांना विभूती फुंकून सभेचे वाईट शक्‍तींपासून रक्षण होण्‍यासाठी हनुमंताला प्रार्थना केली’, तर हा अडथळा दूर होऊ शकतो.’ त्‍याप्रमाणे मी सद़्‍गुरु श्री. सत्‍यवान कदम यांना सांगितल्‍यावर त्‍यांनी तसा उपाय सूक्ष्मातून केला. त्‍यामुळे धर्मसभेत आलेला अडथळा दूर होऊन धर्मसभेला होणारा वीजपुरवठा पुन्‍हा चालू झाला आणि पुन्‍हा सभा चालू झाली. सद़्‍गुरु श्री. सत्‍यवान कदम यांच्‍यामध्‍ये हनुमंताप्रमाणे दास्‍यभाव असल्‍यामुळे त्‍यांनी केलेल्‍या भक्‍तीपूर्ण प्रार्थनेमुळे हनुमंत त्‍यांच्‍यावर लगेच प्रसन्‍न झाला आणि हनुमंताची कृपा सभेवर होऊन सभा निर्विघ्‍नपणे पार पडली. यावरून ‘संत हे भगवंताचे भक्‍त असल्‍यामुळे त्‍यांनी केलेल्‍या प्रार्थनेमुळे भगवंत त्‍वरित प्रसन्‍न होतो’, हा अध्‍यात्‍मशास्‍त्रातील महत्त्वपूर्ण सिद्धांत येथे अनुभवण्‍यास मिळाला.

७ ऊ. सूत्रसंचालक आणि अन्‍य साधक यांनी जोरदार घोषणा दिल्‍यावर उपस्‍थित हिंदू आणि वातावरण यांच्‍यामध्‍ये सूक्ष्म स्‍तरावर धर्मतेज जागृत होणे : महनीय वक्‍त्‍यांचे भाषण चालू असतांना जेव्‍हा विराम घेतला जात होता, तेव्‍हा सूत्रसंचालक आणि अन्‍य साधक जोरदार घोषणा देत होते. या घोषणांमुळे उपस्‍थित हिंदूंमधील धर्मतेज जागृत होऊन संपूर्ण वातावरण धर्मघोषणांनी दुमदुमून निघाले. तेव्‍हा संपूर्ण वातावरण धर्मतेजाने भारित झाल्‍याचे जाणवले.

७ ए. धर्मसभेच्‍या ठिकाणी लावलेल्‍या भगव्‍या रंगाच्‍या ध्‍वजांचे महत्त्व : आकाशमार्गाने धर्मसभेवर सूक्ष्मातून आक्रमण करणार्‍या वाईट शक्‍तींशी धर्मसभेच्‍या ठिकाणी लावलेल्‍या भगव्‍या रंगाच्‍या ध्‍वजांमधून प्रक्षेपित झालेल्‍या तेजोमय धर्मतेज आणि क्षात्रतेज यांच्‍या लहरींचा आघात होऊन त्‍या नष्‍ट झाल्‍या.

श्री. मनोज खाडये

७ ऐ. हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे साधक श्री. विपुल भोपळे यांनी केल्‍यावर सूक्ष्म स्‍तरावर झालेला परिणाम : हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे साधक श्री. विपुल भोपळे यांनी केले. त्‍यांच्‍यामध्‍ये हिंदु धर्माप्रती पुष्‍कळ भाव जाणवत होता. त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍यामध्‍ये क्षात्रभावही पुष्‍कळ प्रमाणात होता. त्‍यामुळे त्‍यांच्‍यातील धर्मभावामुळे त्‍यांच्‍या वाणीकडे चैतन्‍याच्‍या लहरी आकृष्‍ट होत होत्‍या आणि त्‍यांच्‍या वाणीत गोडवा जाणवत होता. त्‍यामुळे त्‍यांची वाणी ऐकून श्रोत्‍यांच्‍या हृदयातीलही धर्मभाव जागृत होत होता. त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍या वाणीतून क्षात्रतेज प्रक्षेपित झाल्‍यामुळे श्रोत्‍यांच्‍यातही क्षात्रभाव जागृत होत होता.

७ ओ. सूत्रसंचालकांनी प.पू. दास महाराज यांनी दिलेला प्रेरणादायी संदेश वाचून दाखवणे : हिंदु राष्‍ट्र जागृती सभेला पानवळ, बांदा येथील संत प.पू. दास महाराज आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. पू. लक्ष्मी नाईक (माई) यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली होती. त्‍या वेळी प.पू. दास महाराजांनी ‘कोटीच्‍या कोटी उड्डाणे झेपावे हिंदु राष्‍ट्राकडे’, म्‍हणजे ज्‍याप्रमाणे प्रभु श्रीरामाच्‍या अवतारी कार्यात समस्‍त वानर सहभागी झाले होते, त्‍याप्रमाणे पृथ्‍वीवर हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी समस्‍त हिंदूंनी या दैवी कार्यात सहभाग घेऊन या ध्‍येयाने कृतीशील होण्‍याचा दिलेला संदेश सूत्रसंचालकाने वाचून दाखवला. तेव्‍हा प.पू. दास महाराज आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. पू. लक्ष्मी नाईक(माई) यांच्‍याकडून संपूर्ण सभेला उपस्‍थित असणार्‍या हिंदूंकडे आशीर्वादात्‍मक पिवळ्‍या लहरी आणि धर्मगंधाच्‍या सुगंधमय लहरी पसरून वातावरण दैवी झाल्‍याचे जाणवले.

८. हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला उपस्‍थित असणार्‍या तीन महनीय वक्‍त्‍यांच्‍या संदर्भातील आध्‍यात्मिक सूत्रे

८ अ. हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला उपस्‍थित असणार्‍या तीन महनीय वक्‍त्‍यांच्‍या भाषणांचे आध्‍यात्मिक महत्त्व

८ आ. महनीय वक्‍त्‍यांच्‍या ओजस्‍वी भाषणांमुळे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या ठिकाणी ईश्‍वरी शक्‍ती आणि चैतन्‍य यांचा ओघ येऊन ते उत्तरोत्तर वाढणे : महनीय वक्‍त्‍यांच्‍या ओजस्‍वी भाषणांमुळे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या ठिकाणी ईश्‍वरी शक्‍ती आणि चैतन्‍य यांचा ओघ येऊन ते उत्तरोत्तर वाढत गेले अन् तेथे सूक्ष्मातून धर्मलोकाचे वायुमंडल निर्माण झाले. त्‍यामुळे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे वातावरण अत्‍यंत उत्‍साहवर्धक, जोशपूर्ण आणि धर्मतेजाने प्रफुल्लित झाले होते. त्‍यामुळे अशा हिंदु राष्‍ट्र-जागृती सभांना उपस्‍थित असणार्‍या हिंदूंमधील धर्माभिमान जागृत होऊन ते धर्मतेजाने भारित झाले होते. त्‍यामुळे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला उपस्‍थित असणार्‍या हिंदूंवर पुष्‍कळ प्रमाणात आध्‍यात्मिक उपाय होऊन त्‍यांच्‍यातील नकारात्‍मकता नष्‍ट झाली आणि हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या शेवटी त्‍यांच्‍यातील सकारात्‍मकता वाढून त्‍यांच्‍याकडून धर्मतेजाच्‍या सकारात्‍मक ऊर्जेची प्रभावळ प्रक्षेपित होत होती. अशा प्रकारे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला उपस्‍थित राहिल्‍यामुळे श्रोते आणि आयोजक-साधक अन् हिंदुत्‍वनिष्‍ठ यांना पुष्‍कळ प्रमाणात आध्‍यात्मिक लाभ झाला.

९. हिंदु जनजागृती समितीच्‍या विविध उपक्रमांना मिळणार्‍या गुरुपौर्णिमांच्‍या फळाचे प्रमाण

कृतज्ञता

धर्मरूपी भगवंतानेच माझ्‍याकडून हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे सूक्ष्म परीक्षण करण्‍याची सेवा करवून घेतल्‍यामुळे मला ‘धर्मतत्त्व सूक्ष्मातून कसे कार्यरत असते ?’, हे शिकण्‍यास आणि अनुभवण्‍यास मिळाले. यासाठी मी धर्मरूपी भगवंताच्‍या चरणी कोटीश: कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.