निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४६
श्री. अभिजित जोशी : दिवसातून २ वेळाच जेवायचे झाल्यास फळे किंवा सुकामेवा कधी खावा ?
उत्तर : ‘गोड पदार्थ जेवणाच्या आरंभी खावेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे; परंतु फळे किंवा सुकामेवा जेवण झाल्यावर खाऊ शकतो. यांचे प्रमाण मर्यादित असावे, उदा. एखादे केळे, अर्धी मूठ शेंगदाणे किंवा २ – ३ खजूर. जेवणानंतर एका वेळी एकच पदार्थ खावा, उदा. केळे खाल्ल्यास खजूर किंवा शेंगदाणे खाऊ नयेत. स्वतःच्या भुकेच्या प्रमाणावर, तसेच किती खाल्ल्यावर पचते, याचा अभ्यास करून प्रमाण ठरवावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२३)
तुमच्या प्रश्नांमुळे इतरांनाही शिकता येते.
प्रश्न विचारण्यासाठी संपर्क : [email protected] |