हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याची वस्‍तूनिष्‍ठ माहिती समाजापर्यंत पोचवण्‍यासाठी अद्ययावत माहितीचा आधार घ्‍या !

हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांना सूचना !

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक समितीच्‍या कार्याची माहिती समाजापर्यंत पोचवण्‍यासाठी लग्‍नपत्रिका, स्‍वतःच्‍या उत्‍पादनाचे विज्ञापन करणार्‍या पिशव्‍या, आस्‍थापनाचे विज्ञापन करणारी दैनंदिनी (डायरी) आदींवर समितीची माहिती छापतात. समितीच्‍या दिवसेंदिवस वाढत चाललेल्‍या कार्याच्‍या अनुषंगाने ही सर्व माहिती अद्ययावत होत असते. ही अद्ययावत माहिती सर्वांना कळावी आणि समितीचे कार्य वस्‍तूनिष्‍ठपणे समाजापर्यंत पोचावे, यासाठी पुढील माहिती ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत प्रसिद्ध करत आहोत. समितीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी प्रसार करतांना या माहितीतील आकडेवारीचा उपयोग करावा, असे समितीच्‍या वतीने कळवण्‍यात आले आहे. ३१.१२.२०२२ पर्यंतची कार्याची संख्‍यात्‍मक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

१.  ४७० विनामूल्‍य धर्मशिक्षणवर्गांद्वारे हिंदूंना धर्मशिक्षण आणि ५०० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे संघटन !

२.  ७ भाषांत, १३ राज्‍यांत २ सहस्र ८१ ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभां’द्वारे २० लाख ९२ सहस्रांहून अधिक हिंदूंमध्‍ये जागृती !

३.  ९,००० हून अधिक फलक-प्रदर्शनांद्वारे राष्‍ट्र आणि धर्म जागृती !

४.  प्रबोधन, वैध रितीने आंदोलने आणि न्‍यायालयीन लढा यांच्‍या माध्‍यमातून ४५० हून अधिक देवतांची विडंबन झालेली प्रकरणे रोखली !

५. हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना संघटित करण्‍यासाठी गोवा येथे आयोजित ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशने’ !

अ. पहिले अधिवेशन (जून २०१२) : १७ राज्‍यांतील ५० हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी आणि धर्माचार्य, संपादक यांसह १४५ हिंदुत्‍वनिष्‍ठांची उपस्‍थिती

आ. दुसरे अधिवेशन (जून २०१३) : ४ देश, २१ राज्‍ये यांतील ७० हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे नेते, तसेच धर्माचार्य, विचारवंत, संपादक, लेखक, अधिवक्‍ता आदी ३२० जण सहभागी

इ. तिसरे अधिवेशन (जून २०१४) : ३ देश, २० राज्‍ये यांतील १२५ हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे नेते, तसेच धर्माचार्य, विचारवंत, संपादक, लेखक, अधिवक्‍ता आदी ३७५ जण सहभागी

ई. चौथे अधिवेशन (जून २०१५) : ३ देश, २० राज्‍ये यांतील २०० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे नेते, तसेच धर्माचार्य, विचारवंत, संपादक, लेखक, अधिवक्‍ता आदी ४०० जण सहभागी

उ. पाचवे अधिवेशन (जून २०१६) : ३ देश, २२ राज्‍ये यांतील १६१ हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे नेते, तसेच धर्माचार्य, विचारवंत, संपादक, लेखक, अधिवक्‍ता आदी ४०० जण सहभागी

ऊ. सहावेे अधिवेशन (जून २०१७) : ३ देश, २२ राज्‍ये यांतील १३२ हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे नेते, तसेच धर्माचार्य, विचारवंत, संपादक, लेखक, अधिवक्‍ता आदी ३४२ जण सहभागी

ए. सातवे अधिवेशन (जून २०१८) : ३ देश, १८ राज्‍ये यांतील १७५ हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे नेते, तसेच धर्माचार्य, विचारवंत, संपादक, लेखक, अधिवक्‍ता आदी ३७५ जण सहभागी

ऐ. आठवे अधिवेशन (जून २०१९) : २ देश, २५ राज्‍ये यांतील १७४ हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे नेते, तसेच धर्माचार्य, विचारवंत, संपादक, लेखक, अधिवक्‍ता आदी ५२० जण सहभागी

ओ. नववे अधिवेशन ‘ऑनलाईन’(२०२०) : हे अधिवेशन समितीच्‍या ‘यू ट्यूब’ चॅनल आणि ‘फेसबूक पेज’द्वारे ६८,००० हून अधिक लोकांनी प्रत्‍यक्ष पाहिले, तर ३ लाख ४५,००० हून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला.

औ. दहावे अधिवेशन (२०२२) : भारतातील २६ राज्‍यांसह अमेरिका, हाँगकाँग, नेपाळ, फिजी आणि इंग्‍लंड येथील १७७ हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे ४०० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी

हे सर्व जण ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापनेच्‍या कार्याला मूर्त स्‍वरूप देण्‍यासाठी कटीबद्ध असून या समवेतच या अधिवेशनाच्‍या धर्तीवर भारतभरात विविध ठिकाणी १६७ ‘प्रांतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनां’चे आयोजन करण्‍यात आले आहे.

६. ८ राज्‍यांत १,६७० ठिकाणी मासिक ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनां’द्वारे हिंदूंशी संबंधित ३७६ विषयांना वाचा फोडली !

७. १८० हून अधिक देशात प्रतिमास १.५ लाखांहून अधिक वाचकसंख्‍या असलेले हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्‍थळ :  HinduJagruti.org