हिरकणी कक्षाची दुःस्‍थिती आढळल्‍याने आमदार सरोज अहिरे यांच्‍याकडून खेद व्‍यक्‍त

आमदार सरोज अहिरे

मुंबई – नाशिक येथील देवळाली मतदारसंघाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या आमदार सरोज अहिरे या बाळाला घेऊन अधिवेशनासाठी आल्‍या होत्‍या; परंतु बाळाला ठेवण्‍यासाठी विधीमंडळातील हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्‍याने त्‍यांनी खेद व्‍यक्‍त केला. ‘माझे बाळ आजारी असून मी त्‍याला औषधे देऊन घेऊन आले आहे; परंतु या धुळीत बाळाला ठेवू शकत नाही. त्‍यामुळे मला जावे लागत आहे’, अशी खंत त्‍यांनी माध्‍यमांशी बोलतांना व्‍यक्‍त केली.

‘आठ दिवसांपूर्वी विधानसभा अध्‍यक्ष भेटले नसल्‍याने प्रधान सचिवांना हिरकणी कक्षाची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी पत्र दिले होते; परंतु तेथे स्‍वच्‍छता नाही. उद्यापर्यंत व्‍यवस्‍था न झाल्‍यास मला मतदारसंघात परत जावे लागेल’, असे त्‍यांनी या वेळी सांगितले.