महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार येथे पार पडले ग्रंथप्रदर्शन !

वाराणसी – महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ९ ठिकाणी, तर बिहार येथे ४ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. या सर्व ठिकाणी ग्रंथांसह सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक यांचेही प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनांना शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वाराणसी येथील एका ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

क्षणचित्र

मार्कंडेय महादेव मंदिराजवळ लावण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये महाराणा प्रताप यांच्याविषयीचा फ्लेक्स फलक पाहून शिवभक्त श्री. आशुतोष सिंह यांनी सांगितले, ‘‘सनातन संस्था जे कार्य करत आहे, ते उल्लेखनीय आहे. मी सुद्धा सनातनी हिंदु असून आपण सर्वांनी सनातनला समर्थन करायला हवे. तुम्ही प्रसारासाठी आमच्या भागात येऊ शकता. मी आपणास सहकार्य करीन.’’