खानापूर (जिल्हा सांगली) येथील हुतात्मा नायब सुभेदार जयसिंह भगत अनंतात विलीन !

खानापूर येथील भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंह तथा बाबू शंकर भगत यांच्यावर २१ जानेवारीला खानापूर येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सियाचीन येथील सीमेवर कर्तव्य बजावतांना हिमस्खलनात ते गंभीररित्या घायाळ झाले होते. उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली होती.  

श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री पंचमुखी गणेश मंदिराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम !

वर्ष १९९५ ला स्थापन केलेल्या पंचमुखी गणेश मंदिरास या वर्षी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे सोहळा काळात महाआरती, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, पारायण, भजन, श्रीगणेशाचा अभिषेक, जन्मकाळ आणि पालखी सोहळा, असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

घाटकोपर (मुंबई) येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्‍यात सहभागी १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची चेतावणी !

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहील !

चंद्रपूर येथील ५ स्‍थानिक अधिवक्‍त्‍यांकडून तक्रार प्रविष्‍ट !

हिंदु धर्माची अपकीर्ती करणार्‍या धर्मांधांच्‍या विरोधात अधिवक्‍ते कधीही तक्रार प्रविष्‍ट करत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

‘सम्‍मेद शिखरजी’ या धार्मिक स्‍थळाला ‘तीर्थक्षेत्र’ घोषित करा !

झारखंड राज्‍यातील ‘सम्‍मेद शिखरजी’ या जैन समाजाच्‍या दृष्‍टीने पवित्र असलेल्‍या धर्मस्‍थळाला तीर्थक्षेत्र म्‍हणून घोषित करण्‍यात यावे, या मागणीसाठी सांगोला येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्‍त जैन समाज यांच्‍या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्‍यात आले.

मारहाणीप्रकरणी आमदार बच्‍चू कडू यांना न्‍यायालयाकडून १५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा !

अपघातामध्‍ये अपक्षचे आमदार बच्‍चू कडू यांना झालेल्‍या दुखापतीमुळे शासकीय अधिकार्‍याला मारहाण केल्‍याच्‍या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्‍यायालयाने पुढे ढकलली आहे. ही सुनावणी १५ फेब्रुवारी या दिवशी होईल.

भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !

मानवाचे चिरंतन कल्याण करणारे अध्यात्मशास्त्र आणि साधना. ती हिंदु धर्माची जगाला देणगी आहे. असे असूनही भारतातील आतापर्यंतच्या एकाही राजकारण्याला त्याचे महत्त्व कळले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःची, भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्‍पाला अंदाजपत्रक तरतूद करा !

जल अभ्‍यासक प्रवीण महाजन यांची देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे मागणी !

हॉकीची ऐशी-तैशी !

भारतातील एकही आस्‍थापन हॉकीसाठी पुढे का येत नाही ? हॉकीच्‍या खेळाडूंना स्‍वत:चा ‘ब्रँड अ‍ॅम्‍बॅसेडर’ बनण्‍यासाठी किती आस्‍थापने आमंत्रित करतात ? एकूणच हॉकीच्‍या प्रोत्‍साहनार्थ संपूर्ण व्‍यवस्‍थेने भगीरथ प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, हे मात्र खरे !