हलाल प्रमाणपत्रातून मिळणार्‍या पैशाचा वापर कुठे केला जातो, याची चौकशी करायला हवी ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

यावल (जिल्‍हा जळगाव) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत हिंदूंंचा कृतीशील होण्‍याचा निर्धार !

एअर इंडियाच्‍या विमानात दारू देण्‍याच्‍या धोरणात पालट !

एअर इंडियाने तिच्‍या विमानांमध्‍ये प्रवाशांना दारू वितरित करण्‍याच्‍या धोरणात पालट केला आहे. जे प्रवासी स्‍वतःसमवेत दारू घेऊन येतात त्‍यांच्‍याकडे सतर्कतेने लक्ष देण्‍यात येणार आहे

महाराष्‍ट्रात मराठी भाषिकांना दिले जाणार उर्दूचे धडे !

मातृभाषेची दुरवस्‍था असतांना महाराष्‍ट्रात मराठीसह अन्‍य भाषिकांना उर्दूचे धडे कशासाठी ?

मंत्रालयात राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाविषयी विखारी लिखाण असलेल्‍या पुस्‍तकांची उघडपणे विक्री !

राष्‍ट्रवादी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेला ‘राष्‍ट्रविरोधी’ रेखाटणे, हा वैचारिक आतंकवाद होय. महाराष्‍ट्रात हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार सत्तेवर असतांना मंत्रालयात लावण्‍यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनांमध्‍ये अशी हिंदु संघटनांची नाहक अपकीर्ती करणार्‍या पुस्‍तकांची विक्री होणे हिंदूंना अपेक्षित नाही.

शनिशिंगणापूर येथील शनीदेवाला १ कोटी रुपयांचा सोन्‍याचा कलश अर्पण !

भक्‍ताने आपले नाव जाहीर न करण्‍याची विनंती देवस्‍थान प्रशासनाला केली आहे. सायंकाळच्‍या आरतीनंतर हा स्‍वर्णकलश मूर्तीसमोर विधीपूर्वक अर्पण करण्‍यात आला.

जुना पुणे नाका ते सोरेगाव रस्‍त्‍याचे काम अपूर्ण राहिल्‍याने अपघातांची संख्‍या वाढली !

जुना पुणे नाका ते सोरेगाव हा ५४ मीटरचा रस्‍ता तातडीने पूर्ण करा, अशी मागणी ‘वेकअप फाऊंडेशन’ने महापालिकेतील अतिरिक्‍त आयुक्‍त संदीप कारंजे यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली. हा रस्‍ता रखडल्‍याने शहरातील अपघातांची संख्‍या वाढली असून नागरिकांचे नाहक जीव जात आहेत, असे निवेदनात म्‍हटले आहे.

धर्मांधांच्‍या त्रासाला कंटाळून नगर येथे अल्‍पवयीन मुलीची आत्‍महत्‍या !

धर्मांध तरुणांच्‍या त्रासाला कंटाळून अल्‍पवयीन मुली आत्‍महत्‍या करत आहेत, हे संतापजनक आहे. यावरून धर्मांधांनी त्‍यांचे जीवन किती असह्य केले असेल, हे लक्षात येते.

संभाजीनगर येथे महानगरपालिकेची अनधिकृत केबलविरुद्ध धडक कारवाई !

शहरात अनधिकृत केबलचे जाळे निर्माण केले जात असतांना प्रशासकीय अधिकारी झोपलेले होते का ? खंडपिठाचा आदेश आल्‍यानंतर अनधिकृत केबल काढण्‍याची मोहीम राबवण्‍याऐवजी प्रशासन सर्वत्र लक्ष ठेवून स्‍वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते.

महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष १९३७ पासूनचे कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याची महत्त्वाकांक्षी योजना !

२ वर्षांत कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याचा प्रयत्न ! – नीलेश वडनेरकर, माहिती आणि संशोधन अधिकारी, महाराष्ट्र विधीमंडळ