काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची गदग (कर्नाटक) येथील प्रजाध्वनी यात्रेत घोषणा
पणजी, १९ जानेवारी – कर्नाटकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास २ वर्षांत म्हादईवर धरण प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा काँग्रेसचे कर्नाटक येथील विरोधी पक्षनेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गदग (कर्नाटक) येथे १९ जानेवारी या दिवशी काँग्रेस जिल्ह्याच्या प्रजाध्वनी यात्रेत बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकमधील भाजप सरकारच्या म्हादईवरील कळसा-भंडुरा धरण प्रकल्पांच्या ‘सविस्तर प्रकल्प अहवाला’ला (‘डी.पी.आर्.’ला) दिलेली मान्यता ही केवळ आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी केलेली फसवणूक आहे. भाजपला कळसा-भंडुरा प्रकल्प करायचे नाहीत.’’
संपादकीय भूमिकागोव्यातील काँग्रेसवाले सिद्धरामय्या यांचा निषेध करणार का ? |
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦