
लुधियाना (पंजाब) – पंजाब पोलिसांनी खन्ना शहरातील सैन्याच्या मैदानात जिवंत बाँबची पेटी जप्त केली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक हरपाल सिंह यांनी दिली. हे जिवंत बाँब निकामी करण्यासाठी जालंधरचे एक पथक तैनात करण्यात आले होते. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. यापूर्वी ३ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ जिवंत बाँब सापडला होता.
चंडीगडमध्येही सापडला जिवंत बाँब !
चंडीगडचे आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी संजीव कोहली यांनी सांगितले की, चंडीगडमध्ये एक जिवंत बाँब सापडला आहे. सैन्य पथकाला पाचारण करण्यात आले असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकापंजाबमध्ये यापूर्वी झालेल्या हिंसाचारांच्या घटनांमागे खलिस्तान्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. सरकार याही घटनांचे त्या दृष्टीने अन्वेषण करणार का ? |
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk