आम्‍हाला पाकशी सामान्‍य शेजार्‍यासारखे संबंध हवे आहेत; मात्र आतंकवाद नको ! – भारत

परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते अरिंदम बागची

नवी देहली – आम्‍हाला पाकिस्‍तानशी सामान्‍य शेजार्‍यासारखे संबंध हवे आहेत. असे वातावरण निर्माण करायचे असेल, तर आतंकवाद, शत्रूत्‍व आणि हिंसा असता कामा नये, हीच आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते अरिंदम बागची यांनी येथे एका पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केली. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी चर्चा करण्‍याविषयी केलेल्‍या विधानाविषयी त्‍यांनी भारताची भूमिका स्‍पष्‍ट केली. (पाकिस्‍तान आणि आतंकवाद या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू असल्‍याने ते एकमेकांपासून कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, हे गेल्‍या ७५ वर्षांत संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्‍यामुळे भारताने पाकशी चांगले संबंध ठेवण्‍यासाठी नव्‍हे, तर त्‍याला मूळासह नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजे ! – संपादक)

ऑस्‍ट्रेलियातील मंदिरांच्‍या तोडफोडीच्‍या प्रकरणी बोलतांना बागची म्‍हणाले, ‘‘आम्‍ही या घटनांचा निषेध करतो. मेलबर्न येथील आमच्‍या दूतावासाने याविषयी स्‍थानिक पोलिसांकडे सूत्रही उपस्‍थित केले आहे. आम्‍ही गुन्‍हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करण्‍यासह अशा घटना पुन्‍हा घडू नयेत, यासाठी पावले उचण्‍याची विनंती केली आहे. ऑस्‍ट्रेलियाच्‍या सरकारकडेही ही मागणी आम्‍ही केली आहे.’’