त्र्यंबकेश्‍वर येथे पौषवारी यात्रा उत्‍सवाला उत्‍साहात प्रारंभ !

१८ जानेवारी या दिवशी पहाटे ४ वाजता शासकीय महापूजा होईल. महापूजेनंतर नगरपरिक्रमा होणार आहे. या वेळी श्री त्र्यंबकराज भेट आणि कुशावर्त स्नान होईल.

गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे आज हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

हिंदु जनजागृती समिती आणि समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या वतीने गडहिंग्‍लज येथे बुधवार, १८ जानेवारी या दिवशी दुपारी ३.३० वाजता शहरात ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ आयोजित करण्‍यात आला आहे.

सातारा पोलीस दलाच्‍या वतीने अजिंक्‍यतारा गडाची स्‍वच्‍छता मोहीम

सातारा पोलीस दलाला गडाची स्‍वच्‍छता करावी लागणे, हे पुरातत्त्व विभागाला लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?

राष्‍ट्रीय सामंजस्‍य हवे !

म्‍हादईचे पाणी गोवा राज्‍याला मिळावे, याचा अर्थ कर्नाटक राज्‍यातील जनतेचे पाण्‍याविना हाल व्‍हावेत, असे कोणत्‍याही गोमंतकियाला वाटणार नाही. केंद्रशासनाने त्‍यांना अवश्‍य साहाय्‍य करावे; परंतु गोमंतकातील मानवजात आणि येथील सामाजिक जीवनाचा आत्‍माच असलेले जैववैविध्‍य अबाधित रहाण्‍यासाठी कठोर भूमिका घेण्‍यातच भले आहे !

अशा शाळांवर कारवाई झाली पाहिजे !

कर्नाटकच्‍या चामराजनगर जिल्‍ह्यातील ‘ख्राईस्‍ट सी.एम्.आय. पब्‍लिक स्‍कूल’ने मकरसंक्रांतीच्‍या दिवशी, म्‍हणजे रविवारी सुट्टी असतांनाही वर्ग घेतल्‍याने हिंदु जागरण वेदिकेने शाळेच्‍या कृतीचा विरोध केला.

दही खायचे आहे; पण त्‍याचा त्रास न होण्‍यासाठी काय करावे ?

असे अनेक पदार्थ आपण युक्तीने खाऊन त्यांचे चांगले परिणाम मिळवू शकतो, तसेच त्यांच्यावर कांही संस्कार (त्यांच्या गुणांमध्ये अपेक्षित पालट) करून त्यांचे दुष्परिणाम टाळू शकतो !

शेतीवर बांध न घालणारे मंगळवेढावासिय !

अन्‍य गावाच्‍या शेतकर्‍यांनीही मंगळवेढा गावाचा आदर्श घेऊन मनाचे बांध तोडून शेतीच्‍या बांधावरून होणारे वाद रोखावेत !

‘सनातन प्रभात’मधून दिल्‍या जाणार्‍या योग्‍य दृष्‍टीकोनांनुसार कृती करून गोवा येथील साधिकेने श्री गणेशाचे विडंबन रोखण्‍याचा केलेला प्रयत्न !

शाळेत मुलांनी रंगवलेली चित्रे प्रदर्शित करण्‍यात आली होती. त्‍यामध्‍ये श्री गणेशाचे विडंबन करणारी काही चित्रे होती. याविषयी मी शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकांना या चित्रांमधून श्री गणेशाचे विडंबन कसे होत आहे ? हे समजावून सांगितले.

आरोग्‍याविषयी शंकानिरसन

प्रतिदिन स्‍वतःच्‍या मनाला ‘जेव्‍हा सकाळी अल्‍पाहाराच्‍या वासाने मला खावेसे वाटेल, तेव्‍हा ‘प्रतिदिन केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत जिभेवर संयम ठेवल्‍याने मला निरोगी जीवनाचा आनंद घेता येणार आहे’, याची जाणीव होईल आणि मी घरातील कामे करीन’, अशी सूचना दिवसातून न्‍यूनतम ५ वेळा द्यावी आणि याप्रमाणे आचरण करावे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त प्रबोधनपर प्रसारसाहित्‍य उपलब्‍ध !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची २५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी तिथीनुसार आणि २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी दिनांकानुसार पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्त पुढील प्रसारसाहित्‍य नेहमीच्‍या संगणकीय ठिकाणावर उपलब्‍ध करण्‍यात आले आहे.