सातारा, १७ जानेवारी (वार्ता.) – मकरसंक्रांतीनिमित्त ‘आपले गडकिल्ले, आपली जबाबदारी’ या मोहिमेच्या अंतर्गत सातारा पोलीस दलाच्या वतीने अजिंक्यतारा गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील सामाजिक संस्थांनीही यात सहभाग नोंदवला. पोलीसदलातील २५० हून अधिक कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले. प्लास्टिकचे कागद, बाटल्या गोळा करून सर्व कचरा गडावरून खाली आणून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर मंगळाई मंदिर परिसरात उपस्थितांना इतिहासतज्ञांनी मार्गदर्शन केले.
संपादकीय भूमिकासातारा पोलीस दलाला गडाची स्वच्छता करावी लागणे, हे पुरातत्त्व विभागाला लज्जास्पद नव्हे का ? |